घरताज्या घडामोडीमुंबईत पाच आठवड्यातच १ हजार मिमी पावसाचा टप्पा पार

मुंबईत पाच आठवड्यातच १ हजार मिमी पावसाचा टप्पा पार

Subscribe

मुंबईत गेल्या आठवड्याच्या विकेंडला मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाचा जोर आता गेल्या काही दिवसात कमी झालेला आहे. पण अवघ्या पाच आठवड्यातच मुंबईच्या पावसाने १ हजार मिमीचा टप्पा पार पाडलेला आहे. जून महिन्याचा तसेच जुलै महिन्याचाही बहुतांश कोटा या पावसामुळे पुर्ण झाला आहे. मुंबई शहर आणि उपनगर असा एकत्रिकपणे हा पाऊस झालेला आहे.

मॉन्सूनच्या १ जून ते ८ जुलै या कालावधीत दक्षिण मुंबईतील कुलाबा वेधशाळा येथे १००५.२ मिमी पावसाची नोंद झाली. तर जून महिन्यात ५२४ मिमी पावसाची नोंद झाली होती. जूनमधील अपेक्षित पावसापैकी ९७ टक्के पाऊस या कालावधीत झाला. तर जुलैमध्ये आतापर्यंत ४८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलैमध्ये सरासरी ७११ मिमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत अवघ्या ८ दिवसांमध्ये पडलेला पाऊस हा ६७ टक्के इतका आहे. यंदा मॉन्सूनचे आगमन १४ जूनला झाले असले तरीही प्रादेशिक हवामान केंद्र पाऊस मोजताना १ जून पासून हा पाऊस मोजायला सुरूवात करते. मुंबई झालेला एकुण पाऊस म्हणूनच पाच आठवड्यात १ हजार मिमी इतका झालेला आहे.

- Advertisement -

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या सांताक्रुझ येथील वेधशाळेत १००२ मिमी पावसाची नोंद ही १ जून ते ८ जुलै या कालावधीत झाली आहे. तर मुंबई उपनगरात गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी पावसाची नोंद झालेली आहे. मुंबई उपनगरात अवघ्या ३९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारीही मुंबईत काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाली. तर गुरूवारी मात्र सकाळी मुंबईकरांना सुर्य पहायला मिळाला आहे. मुंबईत अनेक भागात आज ऊन पडल्याचे चित्र होते. हवामान विभागाकडून आजही काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला होता. आजही काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -