राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात, ही लाट संपली असं माझं वैयक्तिक मत – राजेश टोपे

राजेश टोपे यांच्या हस्ते आज जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे परिणाम भोगले, त्यामुळे राज्यातील कोरोना एकदम संपला आहे, अशी भूमिका घेऊन चालणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

rajesh tope has hinted that the use of masks may become mandatory in the state in the wake of corona
rajesh tope has hinted that the use of masks may become mandatory in the state in the wake of corona

मुंबईः सध्या राज्यात 9 हजार कोरोना रुग्ण असून, आधी तिसऱ्या लाटेतील कोरोनाबाधितांची दररोजची संख्या ही 48 हजारांपर्यंत होती. आता आकडा अधिकच खाली आलेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून, आता चिंतेचा विषय नक्कीच नाही. त्यामुळे ही तिसरी लाट संपली, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

राजेश टोपे यांच्या हस्ते आज जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे परिणाम भोगले, त्यामुळे राज्यातील कोरोना एकदम संपला आहे, अशी भूमिका घेऊन चालणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

सध्या आपण निर्बंध मुक्तीकडे वाटचाल करीत आहोत, मात्र मास्कमुक्तीचा निर्णय घेताना घाईगडबड चालणार नाही, हा निर्णय विचार करूनच घ्यावा लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं आज राज्यात दहा टक्के पण रुग्ण नाहीत. त्यामुळे तिसरी लाट आटोक्यात आणण्यात राज्य सरकारला यश आलं आलं आहे. मात्र कोरोना पूर्णपणे हद्द पार झालाय, अशा भ्रमात न राहता मास्कमुक्तीचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत.

राज्यातील नागरिकांना सरसकट बूस्टर डोस देण्यात यावा, अशी कोणतीही मागणी राज्याच्या टास्क फोर्सने केलेली नाही. बूस्टर डोस नागरिकांना देण्याबाबत केंद्र सरकार जो निर्णय घेईल, त्याप्रमाणे नागरिकांना बूस्टर डोस दिला जाईल, असंही राजेश टोपेंनी सांगितलंय. मुंबईत कोरोनावरील दीड लाख डोसची एक्सपायरी डेट जवळ आल्याने आरोग्य विभागासमोर हा चिंतेचा विषय नक्कीच आहे. मात्र राष्ट्रीय पातळीवर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. जालन्यातील पल्स पोलिओ लसीकरण कार्याक्रमाला यायला इतर कार्यक्रमामुळे उशीर झाला असला तरी लसीकरण सकाळीच सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचाः Russia Ukraine War : ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत 240 भारतीयांना घेऊन बुडापेस्टहून तिसरे विमान दिल्लीला पोहोचले