घरमहाराष्ट्रनागोठणे पूर्वपदावर

नागोठणे पूर्वपदावर

Subscribe

 लाखो रुपयांचे नुकसान

शहरात रविवारी आलेला पूर त्याच दिवशी सायंकाळी उशिरा ओसरण्यास प्रारंभ झाल्यानंतर नागरिकांनी आपल्या घरातील, तसेच व्यापार्‍यांनी दुकानांची साफसफाई करण्यास सुरूवात केली आहे. भिजलेला माल, तसेच घरातील खराब कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीचे सफाई कामगार सोमवारी सकाळपासून कामाला लागल्याने दुपारपर्यंत बहुतांशी बाजारपेठ, तसेच कोळीवाड्याचा भाग स्वच्छ करण्यात आला.

पूरग्रस्त भागात नाले, तसेच गटारात औषधी पावडर टाकण्यात आली असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाप्रमाणे रविवारी सायंकाळपासूनच नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी सकाळपासून बाजारपेठेतील दुकानांचे पंचनामे करण्यास प्रारंभ केला असल्याचे मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल यांनी सांगितले. या महापुरात अनेक दुकानांमधील मालाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बहुतांश दुकानांमधील मालाचा विमा काढला असला तरी, त्यांना विमा कंपन्यांकडून नुकसानीची रक्कम किती मिळेल, हे मात्र सध्या तरी गुलदस्त्यात आहे.

- Advertisement -

दरम्यान, मोहोल्ल्यातील युब मुल्ला यांच्या घरातसुद्धा पाण्याची पातळी १० फूट इतकी झाल्याने घरामागच्या दोन भिंती कोसळल्या असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -