घरताज्या घडामोडीनागपूरमध्ये पोलिसाचा अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न!

नागपूरमध्ये पोलिसाचा अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न!

Subscribe

इयत्ता सहावीत शिकणारी पीडीत मुलगी गाढवे रहात असणाऱ्या परिसरातच राहते. बुधवारी सकाळी तिचे आई-वडील कामावर गेले होते. पीडित मुलगी व तिची लहान बहीण घरीच होती.

देशभरात लॉकडाऊन सुरू असताना मात्र लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतीच हरीयाणात एक कोचिंग क्लासच्या शिक्षकाने विद्यार्थिनीवर केलेल्या बलात्काराची घटना ताजी असताना आणखी धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबलने १३ वर्षीय विद्यार्थिनीवर तीच्या घरात घुसून अत्याचार केले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपी हेड कॉन्स्टेबलला अटक केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात बालकांवरच्या अत्याचाराच्या आणि हिंसेच्या घटनांच्या तक्रारींमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. नागपूरमध्ये पोलिसांनीच एका मुलीवर अत्याचार केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रमेश गाढवे (रा. यशोधरानगर) असे अटकेतील पोलीस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो यशोधरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

- Advertisement -

इयत्ता सहावीत शिकणारी पीडीत मुलगी गाढवे रहात असणाऱ्या परिसरातच राहते. बुधवारी सकाळी तिचे आई-वडील कामावर गेले होते. पीडित मुलगी व तिची लहान बहीण घरीच होती. गाढवे हा मुलीच्या घरात घुसला. मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड करताच गाढवे तेथून पसार झाला.

संध्याकाळी पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. तिच्या आईने गाढवे याला जाब विचारला असता, मी कोणाला घाबरत नाही, मी पोलीस असल्याने माझे कोणी काहीही बिघडवू शकत नाही, असे गाढवे मुलीच्या आईला उत्तर दिले. त्यानंतर आईने यशोधरानगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दिली. यशोधरानगर पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून गाढवे याला अटक केली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – लहानग्यांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या, ११ दिवसांत ९२ हजार तक्रारी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -