घरताज्या घडामोडीसमृद्धी महामार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणार?

समृद्धी महामार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणार?

Subscribe

मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर नसले तरी त्याच्या नामकरणावरून मात्र वाद निर्माण झाला आहे. या महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव होता. मात्र आता मोडीत काढून महामार्गाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नामांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे समजते. लवकर त्याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगितली जात आहे.

समृद्धी महामार्ग

साधारण ५६ हजार कोटी रूपये खर्चाच्या तसेच मुंबई-नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. सुमारे १२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदननिर्बंध, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्यमंतील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे. या प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर होऊन प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.

- Advertisement -

या महामार्गाला अटलजींचे नाव देण्याची घोषणा आपण यापूर्वीच करण्यात आली होती. अशा वेळी नको तो वाद कशाला निर्माण करता? अशाप्रकारे दबावाचे राजकारण खेळू नका, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना सुनावले. तेव्हा फडणवीस आणि सेना नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दीक वादानंतर या महामार्गाला ठाकरेंचे नाव न दिल्यास राजीनामा देण्याचा इशाराही शिवसेनेच्या मंडळींनी दिला होता. त्यानंतर नामांतराचा वाद दोन्ही पक्षांनी बाजूला ठेवला होता. आता सत्तांतर होताच या महामार्गाला ठाकरेंचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतला आहे. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी मुख्यसचिवाना दिल्यानंतर आता प्रशासन कामाला लागले आहे.

हेही वाचा – भाजप आमदार मंगलप्रभात लोढा सर्वात श्रीमंत बिल्डर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -