घरदेश-विदेशश्रीरामापेक्षा नेत्यांना राजकारणात रस; महंत गिरींचा टोला

श्रीरामापेक्षा नेत्यांना राजकारणात रस; महंत गिरींचा टोला

Subscribe

शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेचं नाव न घेता, 'या' दोन्ही संघटना स्वत:चा प्रचार आणि राजकराणासाठी अयोध्येत कार्यक्रम करत आहेत, असा आरोप गिरी यांवी यावेळी केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ‘राजकीय नेत्यांना प्रभू रामांपेक्षा राजकारणातच अधिक रस अाहे’, अशा शब्दात महंत गिरी यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. गिरी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सेना अध्यक्ष उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत. तर शिवसनेनेचे संजय राऊत, एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आदी नेते आधीच अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. याचविषयीच बोलताना आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचं थेट नाव घेतलं नाही पण ते म्हणाले, की या नेत्यांना श्रीरामांपेक्षा राजकारणातच अधिक रस आहे. शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेचं नाव न घेता, ‘या’ दोन्ही संघटना स्वत:चा प्रचार आणि राजकराणासाठी अयोध्येत कार्यक्रम करत आहेत, असा आरोप गिरी यांवी यावेळी केला. २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत विश्व हिंदू परिषदेतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही २५ तारखेलाच अयोध्येत दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर गिरी यांनी ही प्रतिक्रिया दिली असल्याचं बोललं जातंय.

यावेळी बोलताना गिरी म्हणाले, की जर हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षांचा मंदिर निर्माण करण्याचा एकच हेतू होता, तर त्यांनी स्वतंत्र कार्यक्रमांचं आयोजन का केलं? तसंच या दोन्ही संघटनांनी जरी कार्यक्रम केले तरी त्यातून राममंदिर बांधण्याबाबत काहीच तोडगा निघणार नाही, असंही गिरी म्हणाले. दरम्यान, शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात आखाड्याशी संबंधित साधू-संत सहभागी होणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. उपलब्ध माहितीनुसार, आखाडा परिषद २५ नोव्हेंबरला होणाऱ्या शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमांपासून फारकत घेणार असून,  ४ आणि ५ डिसेंबर रोजी अयोध्येत त्यांची स्वतंत्र बैठक घेणार आहेत. मुस्लीम धर्मगुरुंसह अयोध्या प्रकरणातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आल्याचं समजतंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -