घरमहाराष्ट्रNashik Drugs : नाशिकच्या आजी-माजी पालकमंत्र्यांचे गुंडांना अभय; 20 तारखेला ठाकरे गट काढणार मोर्चा

Nashik Drugs : नाशिकच्या आजी-माजी पालकमंत्र्यांचे गुंडांना अभय; 20 तारखेला ठाकरे गट काढणार मोर्चा

Subscribe

नाशिक : नाशिकमध्ये वाढता ड्रग्जचा व्यापार आणि गुन्हेगारीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, माजी पालकमंत्री आणि मंत्री छगन भुजबळ आणि पोलीस यंत्रणेवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत नाशिकमध्ये ड्रग्जच्या विळख्यात गेल्याचा आरोप केला आहे. यासाठी नाशिकचे आजी-माजी पालकमंत्र्यांनी गुंडांना पोसलेय, असा घाणघातील आरोप संजय राऊतांनी केला आहे. नाशिक ड्रग्ज प्रकरणाविरोधात ठाकरे गट येत्या 20 तारखेला जिल्हधिकारी कार्यलयावर विरोटा मोर्चा काढणार असून या मोर्चात सामाजिक संस्था, नागरीक आणि पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन संजय राऊतांनी नाशिककरांना केले आहे.

नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणावर संजय राऊत म्हणाले, “या नाशिक शहराचे सध्याचे पालकमंत्री आणि ज्यांना उद्या पालकमंत्री व्हायचे आहे. त्यासाठी त्यांच्या खटपट्टी सुरू आहे. हे दोन्ही नेते नाशिकच्या अदोगदीला जबाबदार आहेत, असा थेट आरोप संजय राऊतांनी केला आहे. “नाशिकच्या घराघरात ड्रग्ज पोहोचले आहे. तरुण मुले, विद्यार्थी शाळा, कॉलेज पान टपऱ्या, छोटी-छोटी दुकाने नाशिकमध्ये असा ड्रग्जचा व्यवहार सुरू आहे. तरुण पिढी जर बर्बाद होत असेल तर शासकीय यंत्रणा पालकमंत्री, मंत्री, आमदार आणि पोलीस सहभागी असतील तर शिवसेना स्वस्थ बसू शकत नाही. यासंदर्भात उद्धव ठाकरेंशी चर्चा झालेली आहे. नाशिकला हा जो ड्रग्जचा विळखा पडलेला आहे. जो गुन्हेगारीचा विळखा पडलेला आहे. त्याविरोधात शिवसेनेने एकमोठे आंदोलन हाती घेईचे ठरविले आहे. ”

- Advertisement -

हेही वाचा – Asian Games : अस्तित्वात नसलेल्या नदीवर सिंचन प्रकल्प उभारण्याचा प्रकार… दानवेंची केंद्रावर टीका

नाशिकमध्ये ड्रग्जविरोधात ठाकरे गटाचा विराट मोर्चा

संजय राऊत पुढे म्हणाले, “20 तारखेला शिवसेनेचा विराट मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघेल. हा मोर्चा फक्त शिवसेनेचा नाही. या शहरातील जिल्ह्यातील नागरिकांनी आणि पालकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होऊन आपला निषेध व्यक्त करावा. यासाठी आमचे प्रयत्न राहतील, हा विषय राजकीय नसून सामाजिक आहे. हे राजकारण नाही, ज्यांना ज्यांना आमच्या आंदोलना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे. मग समाजिक संस्थ किंवा राजकीय पक्ष असतील. पण या विराट मोर्चाचे नेतृत्त्व शिवसेनेचे असेल, हा आमचा इशारा मोर्चा आहे. जे या ड्रग्ज माफिया आणि गुंडांना पोसतंय आहेत. त्यांच्यासाठी हा इशारा आहे. हे ड्रग्ज कुठे विकले जाते, हे हाफ्ते कुठे जात आहेत. राजकारणात, पोलीस खात्यात कुठे कुठे हाफ्ते जात आहेत. ती सर्व यादी आमच्याकडे आहे. ते आम्ही जाहीर करू किंवा त्यांच्या घरावर धाडी टाकू. आमचे ठरलेले आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -