घरताज्या घडामोडीनाशिकचे आर्टीलरीचे जवान संतोष गायकवाड यांचा मृत्यू

नाशिकचे आर्टीलरीचे जवान संतोष गायकवाड यांचा मृत्यू

Subscribe

नाशिक तालुक्यातील लहवितचे भुमीपूत्र व तोफखाना केंद्राच्या 285मिडियम रेजिमेंटचे लान्सनायक संतोष विश्वनाथ गायकवाड शहिद झाले आहेत. सिक्कीमच्या उत्तरेला आसामच्या ‘लंका’ येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले. अधिकृत माहिती सिक्कीम आर्टीलरी मिडियम रेजिमेंटकडून नाशिकरोड तोफखाना केंद्राला कळविण्यात आले आहे.

नाशिक तालुक्यातील लहवितचे भुमीपूत्र व तोफखाना केंद्राच्या 285मिडियम रेजिमेंटचे लान्सनायक संतोष विश्वनाथ गायकवाड शहिद झाले आहेत. सिक्कीमच्या उत्तरेला आसामच्या ‘लंका’ येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले. अधिकृत माहिती सिक्कीम आर्टीलरी मिडियम रेजिमेंटकडून नाशिकरोड तोफखाना केंद्राला कळविण्यात आले आहे. संतोष गायकवाड यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळ गावी लष्करी इतमामात बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास गायकवाड अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते. (nashik Maharastraputra son Artillery jawan Santosh Gaikwad death Diwali)

मिळालेल्या माहितीनुसार, सिक्कीमच्या उत्तरेला आसाम राज्यातील होजाई जिल्ह्यातील लंका शहराजवळ असलेल्या बर्फाळ प्रदेशात संतोष गायकवाड हे कर्तव्यावर तैनात होते. त्यावेळी तेथील रक्त गोठविणाऱ्या थंडीमुळे त्यांना अचानकपणे मेंदूमध्ये त्रास उद्भवला. त्यानंतर रेजिमेंटकडून तत्काळ त्यांना कोलकात्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

उणे 15 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान या भागात असते. तेथे गायकवाड हे कर्तव्य बजावत होते. ते आर्टीलरीच्या 285मिडियम रेजिमेंटमध्ये लान्सनायक पदावर होते. त्यांचे पार्थिव नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संतोष गायकवाड यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी ही नाशिकरोडच्या तोफखाना केंद्राच्या 621-साठा बॅटरीकडे सोपविण्यात आल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा – जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय केलं? राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना उलट सवाल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -