घरताज्या घडामोडीपीए पॉझिटिव्ह; नाशिक पालिका आयुक्त हायरिस्कमध्ये?

पीए पॉझिटिव्ह; नाशिक पालिका आयुक्त हायरिस्कमध्ये?

Subscribe

आरोग्य वैद्यकीय अधिकारीही हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये; कर्मचार्‍यांमध्ये घबराट

महापालिकेच्या आयुक्तांचे स्वीय सचिव पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे स्वीय सचिव आयुक्तांच्या संपर्कात असल्याने आयुक्तांनाही हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये समावेश झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. याशिवाय आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनाही हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये समावेश झाला असल्याचे कळते. करोना योध्येच जर पॉझिटिव्ह आढळायला लागले तर आरोग्य सेवा कोणाच्या भरोशावर चालणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान, महापालिकेची मदार असलेल्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दोन दिवसात तब्बल आठ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आलेत.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या पद्धतीत अमुलाग्र सुधारणा केल्यामुळे आता नाशिक शहरातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले जाते. नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावताना दिसतात. संबंधित अधिकारी, कर्मचारी सुरक्षीततेची काळजी घेत असले तरीही त्यांच्या संपर्कात पॉझिटिव्ह पेशंट कधी येतील याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. त्यातच आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे स्वीय सचिव पॉझिटिव्ह आढळल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामुळे आता आयुक्तांचा समावेश हाय रिस्क कॉन्टॅक्ट असलेल्यांच्या यादीत झाला आहे. आयुक्तांचे स्वीय सचिव अलिकडे कोणाकोणाच्या संपर्कात आले, ते बैठकांना उपस्थित होते काय याचाही आता तपास घेतला जात आहे. याशिवाय आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके हे देखील हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याचे समजते. त्यामुळे आता महापालिकेतील उर्वरित अधिकारी व कर्मचार्‍यांना अधिक सजगतेने कार्यरत रहावे लागणार आहे.

आयुक्तांच्या पाहणी दौर्‍यात पॉझिटिव्ह आरोग्य सेवक?

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाची पाहणी मंगळवारी (दि. २३) आयुक्तांनी केली. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. तसेच आरोग्य सेवकांशीही चर्चा केली. नेमके मंगळवारीच या रुग्णालयातील आरोग्य सेवक पॉझिटिव्ह आढळून आले. त्यातील किती कर्मचारी आयुक्तांच्या संपर्कात आलेत याविषयी देखील तपास सुरु असल्याचे कळते. मात्र या दौर्‍यामुळे आयुक्तांचा समावेश हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये निश्चित झाल्याचे बोलले जाते.

- Advertisement -

महासभेत घ्या ठोस निर्णय :

करोना नियंत्रणासाठी पुढील नियोजन करण्यासाठी येत्या २५ जूनला महापालिकेची ऑनलाईन महासभा होणार आहे. यात करोना संदर्भातील उपाययोजना आणि लॉकडाऊन या विषयावर चर्चा होणार आहे. त्यापूर्वीच आता महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागल्याने या महासभेला अधिक महत्व आले आहे. या महासभेत शहराशी संबंधित ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी आता पुढे येत आहे.

पीए पॉझिटिव्ह; नाशिक पालिका आयुक्त हायरिस्कमध्ये?
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -