घरमहाराष्ट्रनाशिकआयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, फाळके स्मारक अश्या भाजपच्या महत्वकांक्षी प्रकल्पांना 'ब्रेक'

आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, फाळके स्मारक अश्या भाजपच्या महत्वकांक्षी प्रकल्पांना ‘ब्रेक’

Subscribe

गोदावरीवरील उड्डाणपुलासही प्रशासकांनी स्थगिती देऊन भाजपला दिला झटका

नाशिक : भाजपची महापालिकेतील सत्ता संपुष्टात येऊन प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर भाजपच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना आता घरघर लागली आहे. भाजपने आपल्या सत्ताकाळात राबविलेला ड्रीम प्रोजेक्ट आयटी पार्कसह लॉजिस्टिक पार्क, बीओटीवर भूखंड विकास, फाळके स्मारक, उड्डाणपुलांसारखे बहुचर्चित प्रकल्प आता डब्यात गेले आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने नाशिककरांना वचनपूर्ती दाखविण्यासाठी केलेला अट्टहास प्रशासकीय राजवटीत भाजपच्या अंगलट आला आहे.

महाविकास आघाडीतल्या शिवसेनेसह राष्ट्रवादीनेच आता या प्रकल्पांची कोंडी केल्याने या प्रकल्पांचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. ओबीसी आरक्षणामुळे महापालिकेच्या निवडणुका या लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेतील भाजपची सत्ता १५ मार्च रोजी संपुष्टात आली आहे. भाजपकडे पाच वर्षे सत्ता असली, तरी भाजपने निवडणुकांच्या तोंडावर दोन वर्षे आधी सक्रियता दाखवत शहरात विविध प्रकल्प राबविण्याची मोहीम सुरू केली होती. त्यात आयटी पार्क आणि लॉजिस्टिक पार्क हे भाजपचे ड्रीम प्रोजेक्ट होते. आडगाव शिवारात साडेतीनशे एकर क्षेत्रावर आयटी पार्क उभारण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली होती. त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर केला होता. केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीत परिषदही आयोजित करण्यात आली होती. परंतु, जागा ताब्यात नसल्यामुळे तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी त्यास ‘ब्रेक’ लावला होता. त्यासाठी एक रुपयावर सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव अंगलट येऊन तो विधी विभागाच्या सल्ल्यासाठी पाठविण्यात आला होता. गेल्या दीड महिन्यापासून हा प्रस्ताव धूळ खात पडल्याने आयटी पार्क डब्यात गेल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

आयटी पार्क आणि लॉजिस्टिक पार्कसाठीच्याजागा शहरातील बड्या बिल्डरांच्या असल्याने आता शिवसेनेसह राष्ट्रवादीने प्रशासकांच्या मदतीने या दोन्ही प्रकल्पांना ‘ब्रेक’ लावल्याचे चित्र आहे. शहरातील अकरा भूखंड बीओटीवर विकसित करण्याच्या माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रस्तावालादेखील प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. दुसरीकडे फिल्मसिटीच्या धर्तीवरफाळके स्मारकाचा विकास करण्याच्या प्रस्तावाला खुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांनीच ‘ब्रेक’ लावला आहे. मायको सर्कलवरील उड्डाणपुलांनाही स्थगिती , देऊन राष्ट्रवादीने भाजपला झटका दिला आहे. गोदावरीवरील १५ कोटींच्या उड्डाणपुलासही प्रशासकांनी स्थगिती देऊन भाजपला झटका दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -