घरताज्या घडामोडीपतीदेवासाठी सुहागरात बनली सुहाग लाथ, नववधूने लाथाबुक्के आणि चपलांनी तुडवला

पतीदेवासाठी सुहागरात बनली सुहाग लाथ, नववधूने लाथाबुक्के आणि चपलांनी तुडवला

Subscribe

बिहार येथे राहणाऱ्या वरासाठी सुहागरात ही सुहाग लाथ झाली. सुहागरातला पत्नीने आपल्यावर प्रेम करण्याऐवजी आपल्याला लाथाबुकक्यांनी तुडवत चपलेने बडवलं.

सुहागरात म्हणजेच लग्नानंतरची पहीली रात्र ही नवविवाहीतासांठी स्वप्नवत रात्र असते. आपल्या जोडीदाराला समजून घेण्याची सुरुवात याच क्षणापासून होते. यामुळे या रात्रीप्रती नववधू आणि वर अनेक स्वप्न रंगवतात. पण पटणा मधील बिहार येथे राहणाऱ्या वरासाठी सुहागरात ही सुहाग लाथ झाली. सुहागरातला पत्नीने आपल्यावर प्रेम करण्याऐवजी आपल्याला लाथाबुकक्यांनी तुडवत चपलेने बडवलं. असा आरोप या पतीने केला आहे. पण ही घटना आताची नसून २०१९ साली घडली आहे. रोहीत असे त्याचे नाव असून स्मिता त्याच्या पत्नीचे नाव आहे.

रोहीत आणि स्मिता यांचे लग्न २०१९ साली झाले. लग्नात आपल्या आईवडिलांनी रोहीतला कुवतीपेक्षा जास्त हुंडा दिला. पण लग्नाच्या पाच महिन्यानंतर रोहीत आणि त्याच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी पुन्हा आपला छळ सुरू केला. नंतर त्यांनी आपल्याला घराबाहेरही काढले. याविरोधात मी घऱाबाहेर दोन दिवस उपोषण केले. असा आरोप स्मिताने पोलिसांना केलेल्या तक्रारीत केला आहे. मात्र दुसरी बाजू समजून घेण्यासाठी जेव्हा पोलिसांनी रोहीतच्या कुटुंबीयांची चौकशी केली तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसला. कारण त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्मिताने उपोषणाला बसताच घरातील वीज आणि पाण्याचे कनेक्शन तोडले. तसेच सुहागरातला स्मिताने आपल्याला लाथाबुकक्या तुडवत चपलेनेही मारहाण केल्याचा आरोप रोहीतने केला. हे ऐकून पोलिसांना धक्का बसला. अखेर पोलिसांनी दोघांच्या घरी एक टीम पाठवून त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नसून त्यांच्यातील वाद आता गावातील पंचासमोर मांडण्यात येणार आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -