घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात चाइल्ड पोर्नोग्राफीचे २५ यूजर्स

नाशकात चाइल्ड पोर्नोग्राफीचे २५ यूजर्स

Subscribe

नाशिक सायबर पोलीस करणार १६ ते ३० वयोगटातील संशयितांना अटक

नाशिक : सोशल मीडियावर लहान मुला-मुलींची अश्लिल छायाचित्रे, व्हिडीओ व्हायरल करणार्‍यांविरोधात १६ ते ३० वयोगटातील २५ यूजर्सवर नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षणासाठी कायदे करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्याच्या सायबर सेलने चाइल्ड पोर्नोग्राफीचा गुन्हा करणार्‍यांची यादी स्थानिक सायबर पोलिसांना दिली होती. त्यानुसार सायबर पोलीस २५ युजर्सला अटक करणार आहेत.

भारत सरकारच्या ‘दि नॅशनल सेंटर फॉर मिसींग अँड एक्सप्लोईटेड चिल्ड्रेन’ आणि ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’ यांच्याकडून अल्पवयीन मुलामुलींवरील लैंगिक अत्याचाराबाबत कडक धोरण राबवण्यात आले आहे. त्यात बालकांचे अश्लिल छायाचित्र काढणे, चित्रीत करणे, व्हिडीओ बाळगणे किंवा त्यांचा प्रसार करणे हा माहिती तंत्रज्ञान कायदा-२०००,कलम ६७ (ब) प्रमाणे गुन्हा आहे.

- Advertisement -

अशा प्रकारचे अपराध करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सायबर पोलिसांना देण्यात आले आहेत.
नाशिक शहर सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक या सोशल मीडिया माध्यमांमधून चाईल्ड पोर्नोग्राफी केली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे सोशल मीडियावरुन अश्लिल छायाचित्र व व्हिडीओ स्वत:च्या प्रोफाइलवरून दुसर्‍यांना पाठवणार्‍या २५ जणांची यादी नाशिक सायबर पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात या २५ प्रोफाईलधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी हे करीत आहेत. विशेष दक्षता पथकाने चाईल्ड पोर्नोग्राफी व्हायरल करणार्‍या सोशल मीडियाधारकांच्या प्रोफाइल ब्लॉक केल्या आहेत. याआधीही सायबर पोलीस ठाण्यात चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी दोनहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिक शहरातील व्हॉट्सअ‍ॅप यूसर्जसह इस्टाग्राम, फेसबुज वापकर्त्यांनी अश्लिल शेअरिंग केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. प्राप्त यादीनुसार २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या यूजर्सचे मोबाईल क्रमांक मिळाले असून, त्यांना अटक केली जाईल.
– सूरज बिजली, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

चाईल्ड पोर्नोग्राफी पाहून अल्पवयीन मुलाने एका मुलीवर अत्याचार केल्याची एक प्रकरण आले होते. जिल्ह्यातील अनेक गावातील काही दुकानामध्ये व भद्रकालीमध्ये मेमरी कार्डमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफी भरुन दिले जात असल्याचे उघड आले आहे. त्यावर प्रतिबंध आला पाहिजे. दोनहून अधिक जीबीमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफीचा डाटा चोरीछुपी दिला जात आहे. चाईल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून भद्रकालीतील व्हिडीओ हॉलमध्ये जनजागृती केली आहे. पालकांनी मुलांशी संवाद ठेवला पाहिजे. त्यातून मुला-मुलींमधील गैरसमज दूर होतील. – प्रवीण आहेर, केंद्र समन्वयक, जिल्हा चाईल्ड लाईन, नाशिक

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -