घरमहाराष्ट्रनाशिकदेवळा तालुक्यात पाच मोरांसह आठ कबूतरांचा मृत्यू

देवळा तालुक्यात पाच मोरांसह आठ कबूतरांचा मृत्यू

Subscribe

विषबाधेमुळे या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण होईल स्पष्ट

देवळा तालुक्यातील दहिवड येथील शिंध ओहोळ शिवारात शुक्रवारी पाच मोरांसह आठ पारवे (कबूतर) मृतावस्थेत आढळून आले. याबाबत देवळा वनविभागाने मृत पक्षांचा पंचनामा केला आहे. विषबाधेमुळे या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून शवविच्छेदन अहवालानंतरच पक्षांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल, असे वनविभागाने सांगितले आहे.

हिरामण यादव पवार यांच्या शेतात ५ जुलै रोजी हे पक्षी मृतावस्थेत आढळले. नारायण दामू पवार यांना ही घटना कळताच त्यांनी तालुका प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय देवरे यांना माहिती दिली. देवरे यांनी घटनेची माहिती वन विभागाला कळवताच वनपाल देवरे, वनरक्षक खरात यांच्या पथकाने मृत पक्षांचा पंचनामा करून मृत पक्षी ताब्यात घेतले. तर एक मृत मोर कुत्र्याने लंपास केल्याने सर्वत्र शोध घेऊनही सापडला नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगितले आले. यावेळी ज्ञानेश्वर पवार, भीमराव पवार, चिंतामण भारती, बापू शेवाळे, राजाराम पवार, भाऊसा पवार, सचिन पवार, मंदाबाई पवार, वत्सलाबाई पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -