घरमहाराष्ट्रनाशिकडेल्टाविरोधात प्रशासन सज्ज

डेल्टाविरोधात प्रशासन सज्ज

Subscribe

रूग्ण आढळून आलेल्या भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे आव्हान

 नाशिकमध्ये नुकतेच कोरोना निर्बंधात शिथिलता दिली असतांनाच जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सी सिक्वेेन्सिंग) चाचण्यांसाठी दिलेल्या नमुन्यांपैकी ३० अहवालात डेल्टा व्हेरिएंटचा विषाणू आढळून आल्याने प्रशासनाने तातडीने पावलं उचलत खबरदारीचे आदेश दिले आहेत. रुग्ण आढळून आलेल्या भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येऊन रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असली, तरी कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटनं पुन्हा एकदा चिंतेत भर घातली आहे. देशात आतापर्यंत डेल्टा प्लसचे ४० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. नाशिकमध्ये मात्र डेल्टाचा शिरकाव झाला नव्हता. राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे सर्वाधिक ९ रुग्ण आढळून आले आहेत. जळगावमध्ये ७, तर मुंबईत २ रुग्ण आढळून आले आहेत. अर्थात डेल्टा आणि डेल्टा प्लस हे दोन व्हेरिएंट असल्याने नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने दोनच दिवसांपूर्वी नाशिकमधील निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र आता जिल्ह्यात डेल्टाचा शिरकावं झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना विषाणूच्या या बदललेल्या स्वरूपामुळे तिसर्‍या लाटेला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

या भागात आढळले रुग्ण

  • गंगापूर रोड, सिन्नर तालुक्यातील दोडी, मुसळगाव, ठाणगाव, महाजनपूर, कसबे सुकेणे, मेंढी, वरखेडा गाव, सादीक नगर, घोटी, कळवण, वडाळीभोई, येवला, कासारी नांदगाव
  • नाशिकमध्ये डेल्टाचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. या व्हेरिएंटग्रस्त रुग्णांनी कुठे प्रवास केला? त्यांच लसीकरण झाले होते का? कोरोनाची पुन्हा लागण झाली होती का?, ही माहिती संकलित केली जात आहे.

 

Dr.ashok thoratनाशिकमध्ये डेल्टाचे रुग्ण आढळून आल्यानंतर हे रुग्ण कुणाच्या संपर्कात आले होते का, ज्यांच्या संपर्कात आले त्यांची प्रकृती कशी आहे, याचा शोध घेण्यात येत असून रूग्ण आढळून आलेल्या परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करण्यात आले आहे. यातील काही रुग्ण बरे होऊन घरीही गेले आहेत. या सर्व बाबी आता तपासल्या जात आहेत.
– डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -