घरठाणेगरजू महिलांना आर्थ‍िक अनुदान देणारी ठाणे ही एकमेव महापालिका; महापौर नरेश म्हस्के यांची...

गरजू महिलांना आर्थ‍िक अनुदान देणारी ठाणे ही एकमेव महापालिका; महापौर नरेश म्हस्के यांची माहिती

Subscribe

ठाणे महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने विविध योजनांमधील लाभार्थ्यांना जवळजवळ २१ कोटी रुपयांच्या अनुदानाचे  प्रातिनिधीक स्वरुपात वाटप आज महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले.

गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी ठाणे महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. कोविडकाळात महापालिकेची आर्थिक स्थिती डळमळीत असताना सुध्दा गरीब व गरजू महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणारी ठाणे ही महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

ठाणे महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने विविध योजनांमधील लाभार्थ्यांना जवळजवळ २१ कोटी रुपयांच्या अनुदानाचे  प्रातिनिधीक स्वरुपात वाटप आज महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, महिला बालकल्याण समिती सभापती राधाबाई जाधवर, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे, काँग्रेसच्या गटनेत्या दिपाली भगत, नगरसेवक मिलिंद पाटणकर, तसेच प्रभागसमिती अध्यक्षा नम्रता फाटक, एकता भोईर, आशा डोंगरे, राधिका फाटक, वहिदा खान, वर्षा मोरे, गलिच्छ वस्ती निर्मुल्न समिती सभापती साधना जोशी, महिला व बालकल्याण समिती सदस्या नंदिनी विचारे, परिषा सरनाईक, रुचिता मोरे, मिनल संख्ये, आरती गायकवाड, प्रतिभा मढवी, विजया लासे तसेच माजी परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, उपायुक्त अशोक बुरपल्ले, मारुती खोडके, वर्षा दिक्षीत, समाजविकास अधिकारी दशरथ वाघमारे, महिला बालविकास अधिकारी दयानंद गुंडप व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

मागील दोन वर्षे कोरोनामुळे सर्वच स्तरावर आर्थिक संकट आलेले आहे, त्यामुळे आपण दरवर्षी राबवित असलेल्या योजना प्रलंबित होत्या. महापालिकेने जाहीर केलेल्या योजनांसाठी २२ कोटी रुपयांचा निधी आवश्यक होता. महापालिकेवर गेल्या दोनवर्षात कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी करण्यासाठी करोडो रुपयाचा खर्च झालेला आहे. परंत महापालिकेने राबविलेल्या योजनांचा लाभ गरीब व गरजू महिलांना मिळावा यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचेसोबत बैठक घेवून तातडीने निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्तांनी देखील सकारात्मक विचार करुन निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले. महापालिका राबवित असलेल्या योजनांचा निश्चितच गरीब गरजू महिलांना उपयोग होणार असून आज त्यांना मिळालेली रक्कम ही त्यांनी स्वत:साठी वापरा असेही महापौरांनी यावेळी सांगितले.

यावेळी ‘६ वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या विधवा/ घटस्फोटित महिलांच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे’ या योजनेसाठी एकूण  ११०३० लाभार्थी पात्र ठरले असून एकूण १३ कोटी २३ लाख ६० हजार इतक्या रकमेचे वाटप करण्यात येणार आहे. तर ‘राजकन्या’ योजनेसाठी ७३३ लाभार्थ्यांसाठी १ कोटी ०९ लाख, ९५ हजार, ‘ठामपा क्षेत्रातील आर्थ‍िकदृष्ट्या दुर्बल घटकातील दुर्धर आजाराने ग्रासलेल्या महिलांना (एचआयव्हीग्रस्त, कॅन्सरग्रस्त, अर्धांगवायू, डायलेसीस इ. सारखे गंभीर आजार) उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य करणे’ या योजनेसाठी ५९१ लाभार्थ्यांसाठी १ कोटी, ४७ लाख ७ हजार, ‘जिजामाता/ जिजाऊ महिला आधार योजनेअंतर्गत अनुदान देणे’ या योजनेसाठी १८९७ लाभार्थ्यासाठी ४ कोटी ७४ लाख २५ हजार, ‘किमान ३ वर्षे पुर्ण झालेल्या नोंदणीकृत बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करुन देणे’ या योजनेतील ४३८ लाभार्थ्यांना ४३ लाख ८० हजार असे मिळून २० कोटी, ९९ लाख, ३५ हजार इतक्या रकमेच्या अनुदानाचे वाटप आज करण्यात आले असून लवकरच ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचेही महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

- Advertisement -

तसेच काही योजनांच्या लाभार्थ्यांना मार्चमध्ये अनुदानाचे वाटप करण्यात आले यावेळी १२५ लाभार्थ्यांना ३६ लक्ष ५५ हजार इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले.  महिला बालविकास विभागाच्या एकूण ७ योजनांचा लाभ आजपर्यत १४ हजार ८१४ लाभार्थ्यांनी घेतला असून २१ कोटी ३५ लक्ष, ९० हजार इतक्या एकूण रकमेचे वाटप करण्यात आले आहे. कोविड काळात देखील महिलांना अनुदान दिल्याबद्दल उपस्थित महिलांनी महापौर नरेश म्हस्के व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.


हेही वाचा – महाडमधील घरे पुन्हा बोलकी होताहेत…बाजारपेठेत मात्र अजूनही चिखलाचे साम्राज्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -