घरमहाराष्ट्रनाशिकजामीन मिळाल्यानंतरही वकीलाला केली अरेरावी, संशयिताचा जामीन फेटाळण्याची मागणी

जामीन मिळाल्यानंतरही वकीलाला केली अरेरावी, संशयिताचा जामीन फेटाळण्याची मागणी

Subscribe

मूकमोर्चा काढण्यास पोलिसांनी नाकारली परवानगी

जिल्हा न्यायालयात येऊन पोलिसांसह वकीलास अरेरावी करणार्‍या संशयिताने जामीन मिळताच पुन्हा वकिलास अरेरावी व दमदाटी केल्याने जिल्हा न्यायालयातील वकील आक्रमक झाले आहेत. गुरुवारी (दि.२८) सकाळी ११ वाजता वकिलांनी एकत्र येत अरेरावी केल्याच्या घटनेचा निषेध करत घोषणाबाजी केली. कोरोनामुळे मूक मोर्चास परवानगी नसल्याने वकिलांच्या शिष्टमंडळाने प्रभारी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.

जिल्हा न्यायालयाच्या आवारात १२ ऑक्टोबरला संशयित अब्दुल लतीफ यासिन कोकणी याने पोलीस अंमलदारांना धक्काबुक्की केली. त्यावेळी संशियताने मध्यस्थी वकिलांनाही शिवीगाळ केली. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी त्यास अटक केली. मात्र, जामीन मिळताच संशयिताने संबंधित वकिलास पुन्हा अरेरावी व दमदाटी केली. या घटनेची नाशिक बार असोसिएशनच्या वकिलांनी निषेध केला आहे. नाशिक बार असोसिएशनतर्फे जिल्हा न्यायालयाच्या आवारात गुरुवारी मूक मोर्चा आंदोलनाची तयारी करण्यात आली. मात्र, कोरोनामुळे मोर्चास परवानगी नसल्याचे सरकारवाडा पोलिसांनी वकिलांना सांगितले. त्यानंतर वकिलांचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी पोलीस आयुक्तालयात गेले.

- Advertisement -

वकिलांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रभारी पोलीस आयुक्त बी. जी. शेखर-पाटील यांना दिले. तर वकिलांनी न्यायालयाच्या आवारात अरेरावी घटनेचा निषेध करत वकील संरक्षण कायदा तात्काळ करावा, अशी मागणी केली. न्यायालयात गर्दी झाल्याने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, अ‍ॅड. जालिदंर ताडगे, अ‍ॅड. अजिक्य गिते, अ‍ॅड. संजय गिते, अ‍ॅड. हर्षल केंगे, अ‍ॅड. महेश लोहिटे, अ‍ॅड. कमलेश पाळेकर आदी उपस्थित होते.

या आहेत मागण्या

न्यायालयाच्या प्रवेशव्दारावर वाहतूक पोलीस तैनात करावेत. न्यायालयात फक्त पासधारकांना प्रवेश द्यावा. अब्दुल कोकणींवर तडीपारीची कारवाई करावी. कोकणींशी संबंधित खटले तालुक्यातील न्यायालयाकडे वर्ग करण्यसाठी न्यायाधिशांकडे विनंती करावी. कोकणींचा जामीन रद्दसाठी अर्ज द्यावा.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -