घरमहाराष्ट्रनाशिकव्याकुळ वन्यप्राण्यांचा मोर्चा मानवी वस्तीकडे

व्याकुळ वन्यप्राण्यांचा मोर्चा मानवी वस्तीकडे

Subscribe

दुर्मिळ होत चाललेली वनसंपदा बघता संकटात असलेल्या प्रत्येक प्राण्याचा जीव वाचवणे गरजेचे

नाशिक : नागरी वस्तीलगत वनखात्याच्या जंगलांमध्ये अनेक प्रकारचे वन्यप्राणी आहेत. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे या जंगलातील पाणवठ्यातील पाण्याने तळ गाठल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात या वन्यप्राण्यांना नागरी वस्तीकडे यावे लागत आहे. परिणामी वन्य प्राणी आणि मनुष्य असा संघर्ष निर्माण होताना दिसत आहे. आजवर केवळ बिबट्याच्या हल्ल्यांनी काळजाचा ठोका चुकत होता. आता कोल्ह्यासारखे हिंस्त्र प्राणीही जिल्ह्यातील गावांमध्ये ग्रामस्थांवर हल्ले करत असल्याचे अलिकडे घडलेल्या घटनेवरुन दिसून येते.

जिल्ह्यात तापमान सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. दुसरीकडे परिसरातील नदी, नाले व छोटे पाणी स्रोत कोरडे पडत आहेत. यामुळे नागरिकांप्रमाणेच वनांमध्ये वास्तव्य असणाऱ्या मुक्या प्राण्यांना पण पाणीटंचाईची झळ पोहचत आहे. जंगलातीलही बहुतांश जलस्रोत कोरडे पडत आहेत. त्यामुळे मानवी वस्ती लगतचे जलाशय, विहिरी, तलाव, नदी, पाणवठे यांकडे वन्यप्राणी धाव घेतात. कधी कधी तर हे प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीतही शिरकाव करतात. यातून काहीवेळा त्यांची जीवितहानी सुद्धा होते. वन्यजीव संरक्षण कायद्या १९७२नुसार हा गुन्हा आहे. वन विभाग या अंतर्गत विविध गुन्हे दाखल करून संबंधितांवर कारवाई करतात.

- Advertisement -

तर संपर्क साधा

दुर्मिळ होत चाललेली वनसंपदा बघता संकटात असलेल्या प्रत्येक प्राण्याचा जीव वाचवणे गरजेचे आहे. त्यासाठी वनविभागाला सहकार्य करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. अशी घटना निदर्शनास आल्यास त्वरित १९२६ या वनविभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. जवळील वनपरिक्षेत्र कार्यालय अथवा वनअधिकारी, वनकर्मचारी, पोलीस, प्राणीप्रेमी व्यक्तींना संपर्क करावा.

 

- Advertisement -

या कराव्यात उपाययोजना

» वन्य प्राण्यांसाठी वन विभाग, संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि नागरिक समन्वयातून जंगल परिसरात बारमाही पाणवठ्यांची निर्मिती.
» यावर वन समितीमार्फत देखरेख करण्यात यावी सायंकाळी ६ वाजेनंतर गाव तलावावर वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी
येतात, त्यामुळे ग्रामस्थांनी या वेळेत गुरेढोरे नेऊ नयेत
» वन क्षेत्रात कोणत्याच कारणास्तव आग लावू नये, कारण जंगल जाळल्यामुळे वन्य प्राणी अन्न -निवारा अन् पाण्यासाठी नागरी वस्तीकडे येतात जंगलातील पाणवठ्यांवर आणि वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे
» शक्य असल्यास शेताला व गावाला कुंपण करण्याचा प्रयत्न करावा वन्यप्राणी वस्तीत शिरल्यास घाबरून न जाता गोंधळ करू नये, त्याला शांतपणे गावाबाहेर जाण्याकरता वाट मोकळी करावी तत्काळ वन विभाग, स्थानिक प्राणी कल्याण संस्था, पोलिसांना माहिती द्यावी.
» एखादा वन्यप्राणी घरात शिरल्यास त्याला घरातच जेरबंद करावे. वन विभागाची चमू येऊन सुरक्षित बचाव करेपर्यंत वाट बघावी. वन विभाग पथकाला उशीर होत असल्यास गोंधळ न घालता गावातील तरुण मंडळीला हाताशी घेऊन प्राण्याला कोणतीही इजा न पोहोचवता मुक्त करण्याचा प्रयत्न करावा.
» एखादा वन्यप्राणी पाण्याच्या शोधात विहिरीत पडल्यास सर्वप्रथम एखादी खाट, लाकडाची फळी, शिडी पाण्यात टाकावी, त्यामुळे प्राण्याला सहज बाहेर निघता येईल. वन विभागाला सूचना देऊन प्राण्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा
» वन्यप्राणी नागरी वस्तीकडे आल्यास गोंधळ करणे, फटाके फोडणे, मागे धावणे टाळावे प्राणी घाबरून आणि चिटन प्रतिहल्ला करू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -