घरमहाराष्ट्रनाशिकऐन सणासुदीत बॉश कंपनीच्या ७३० कामगारांवर संक्रांत

ऐन सणासुदीत बॉश कंपनीच्या ७३० कामगारांवर संक्रांत

Subscribe

कंत्राटी कामगारांना गुरुवारपासून कामावरुन अचानक केले कमी, कामगार उपायुक्तालयात घेतली धाव

सातपूर : औद्योगिक वसाहतीतीलन बॉश कंपनीतील ७३० कंत्राटी कामगारांना गुरुवारी (दि. २१) सकाळी पहिल्या शिफ्टपासून अचानक कामावरून कमी केले. याबाबत कमी केलेल्या कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालय गाठत कामावर पुन्हा रुजू करुन घेण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यासंदर्भात कामगार आयुक्तालयात शुक्रवारी (दि. २२) दुपारी ३ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, ज्या कामगारांना काढून टाकण्यात आले आहे, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

बॉश कंपनीत ७३० (एनईटीडब्ल्यू) ७३० कामगार १० वर्षांपासून काम करतात. या कामगारांनी कामावर कायम करावे, यासाठी कामगार न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोर्टाने स्थगिती आदेश दिला असतानाही व्यवस्थापनाने कुठलीही नोटीस, पूर्वसूचना न देता गुरुवारी ७३० कामगारांची हजेरी पंचिंग बंद करत कामावरून कमी केले. याबाबत  सर्व कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालय गाठत कामगार सहआयुक्त शर्वरी पोटे यांना निवेदन दिले. पूर्वसूचना न देता कामगारांना कमी केल्याने याबाबत मध्यस्थी करत कायमस्वरूपी काम करण्याबाबत मागणी केली आहे.

- Advertisement -

कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून कामगार भरती करण्यावर कंपनीचा आता भर असणार आहे. या कामगारांना ईएसआयसी, पीएफसह इतर सुविधा लागू असणार नाही. केवळ आठ ते दहा हजार रुपये टायपेण्ड देवून तीन शिष्टमध्ये या कामगारांकडून उत्पादन केले जाणार आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -