घरक्राइमदोघांच भांडण मिटवायला गेला अन् तिसऱ्याचाच जीव गेला

दोघांच भांडण मिटवायला गेला अन् तिसऱ्याचाच जीव गेला

Subscribe

नाशिक : रुमसमोर लघुशंका केल्याचा जाब विचारत असताना दोघांमध्ये सुरु झालेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी होणे परप्रांतीय युवकाच्या महागात पडले. रागाच्या भरात एकाने परप्रांतीय युवकाचा चाकूने भोसकून केला. पोलिसांनी हल्लेखोरास अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.९) 9.30 वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

योगेश विश्वेश्वर रीकीयासन (मूळ रा. बिहार, हल्ली रा. अक्राळे एमआयडीसीसमोर एल अँन्ड टी कंपनी, तळेगाव शिवार) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. राजकुमार बैजनाथ बियार (रा.सिकणी, पो. बंका, ता. पदुआ, जि.गढवाल, झारखंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोईराकुमार रामप्रवेश रिकीयासन (वय 29, हल्ली रा. अक्राळे एमआयडीसीसमोर, एल अ‍ॅण्ड टी कंपनी, तळेगाव शिवार, ता. दिंडोरी मूळ रा. सुलपुरा, पो. दुग्गल, जि. औरंगाबाद, बिहार) यास राजकुमार बैजनाथ बियार म्हणाला की, तू रुमसमोर लघवी का करतो. या कारणावरुन कुरापत काढून राजकुमार बियार याने धारदार चाकूने सोईराकुमारवर वार केले. त्यावेळी योगेश रीकीयासन मध्यस्थी झाला. रागाच्या भरात राजकुमारने कामगार वसाहतीचे किचनरुमसमोर व किचनरुममधे जाऊन योगेशवर चाकूने वार केले. त्यात योगेशचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कळवण उपविभागीय अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, पोलीस उपनिरीक्षक पी. बी. कावळे, अमोल पवार व ढोकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी संशयित राजकुमार यास अटक केली असून, हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -