घरमहाराष्ट्रनाशिककेवायसी अपडेट नावाखाली आमदार कन्येला ऑनलाईन गंडा

केवायसी अपडेट नावाखाली आमदार कन्येला ऑनलाईन गंडा

Subscribe

सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

 शहरात सायबर गुन्हेगारीत वाढ झाली असून, हॅकर्सकडून अनेकांना लुबाडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. केवायसी अपडेट करण्यासाठी खात्याची माहिती कोणी मागत असेल, तर सावध रहावे, असे आवाहन नाशिक शहर सायबर पोलिसांनी केले आहे. ऑनलाईन गंडा घालणार्‍या भामट्याने शहरातील भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीस केवायसी अपडेटच्या बहाण्याने ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी सायली सुहास फरांदे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, १९ जून रोजी हायटेक भामट्याने मोबाईलवर कॉल करुन एअरटेल कंपनीतून बोलत असल्याचे भासवून सीमकार्ड सुरु ठेवण्यासाठी केवायसी अपडेट करावे लागेल, असे सांगितले. त्यासाठी भामट्याने सायली यांना अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ओटीपी आल्यानंतर तो क्रमांक भामटयास सांगितला. या ओटीओईच्या आधारे भामट्याने सायली यांच्या बँक खात्यातून ३४ हजार ८९१ रुपये परस्पर काढून घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक बंडेवाड करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -