घरमहाराष्ट्रनाशिकदिवाळी खाद्यपदार्थ दुकानांची तपासणी करा : मनसे

दिवाळी खाद्यपदार्थ दुकानांची तपासणी करा : मनसे

Subscribe

नाशिक : नविन नाशिक मधील मिठाई दुकानातील अन्नपदार्थांची तपासणी करून भेसळयुक्त व नियमबाह्य अन्नपदार्थ विकणार्‍या दुकानांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्यावतीने अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त गणेश परळीकर यांना करण्यात आली.

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र मिठाईची दुकाने सजलेली दिसत आहेत. या दिवसात लोकांमध्ये विविध प्रकारच्या मिठाईंना खूप मागणी असते. या संधीचा गैरफायदा घेत अनेक दुकानांमध्ये भेसळयुक्त मिठाईची विक्री सुरू होते. प्रत्येक सणाला अशी भेसळयुक्त मिठाई विक्रि करणार्‍यांवर छापे टाकल्याचे प्रकारही यापूर्वी उघडकीस आले आहेत. त्यामुळे मनसेने आता अशा भेसळयुक्त मिठाई विक्रेत्यांकडे आपला मोर्चा वळवला असून अन्न व औषध प्रशासनाला यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नविन नाशिक मधील बहुतांश मिठाई दुकाने हे परप्रांतिय व्यावसायिकांचे असुन या दुकानातुन विक्री होत असलेल्या मिठाई व अन्न पदार्थांमध्ये भेसळयुक्त व नियमबाह्य घटकांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचा व अनेक दुकानातुन मुदतबाह्य अन्नपदार्थांची सर्हास विक्री होत असल्याचा तक्रारी मनसे पदाधिकारींकडे आल्या आहेत.

- Advertisement -

ह्या दुकानांपैकी बहुतांश दुकानात अत्यंत घाणेरड्या जागेत पदार्थ बनवतात. विषारी द्रव्यांमुळे सणासुदीच्या काळात नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर समस्या उद्भभवन्याचा धोका असुन प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मनसे सुरक्षा रक्षक सेनेचे चिटणीस कैलास मोरे, माजी शहर उपाध्यक्ष संदिप बोरसे, शहर संघटक अर्जुन वेताळ, शहर चिटणीस संदिप दोंदे, देवचंद केदारे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -