मोठी बातमी! मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांचा वरचष्मा होता. खरगे यांना गांधी घराण्याचा पाठिंबा आहे. यासह त्यांच्या नामांकनावेळी पक्षातील सर्व बडे नेते मंडळीसुद्धा उपस्थित होते

mallikarjun kharge

नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाला तब्बल 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष झाले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांना 7897 हून अधिक मते मिळाली असून, शशी थरूर यांना 1072 मतांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत सोमवारी मतदान झाले.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचा वरचष्मा होता. खरगे यांना गांधी घराण्याचा पाठिंबा आहे. यासह त्यांच्या नामांकनावेळी पक्षातील सर्व बडे नेते मंडळीसुद्धा उपस्थित होते. अशा स्थितीत निवडणुकीत खर्गे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असतानाच आता ते अधिकृतरीत्या काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. बुधवारी झालेल्या मतमोजणीनंतर त्यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली आहे.

यावेळी गांधी घराण्यातील एकही सदस्य अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील झाला नव्हता. गेल्या 24 वर्षांत पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरचा नेता काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाला आहे. यापूर्वी सीताराम केसरी हे गांधी घराण्याबाहेरचे काँग्रेसचे अध्यक्ष होते, जे गांधी घराण्यातील नव्हते.