घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात उभारले जाणार बाल हक्क उद्यान

नाशकात उभारले जाणार बाल हक्क उद्यान

Subscribe

नाशिक : बालस्नेही महाराष्ट्र व बालकांचा सन्मान करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा एकत्र येणे गरजेचे आहे. राज्य शासन, प्रशासन, पोलीस एकत्र आले तर राज्यात सकारात्मक बदल होईल. बालकांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण व्हावे व बालकांना त्यांचे हक्क समजण्यासाठी जिल्ह्यात बाल हक्क उद्यान व बालभवन उभारले जावे, यासाठी जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या आहेत. शिवाय, बालमजुरी व बालगुन्हेगारी रोखण्यासाठी दर १५ दिवसांनी पोलीस घटनास्थळी जाऊन भेटी देणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांनी विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदत दिली.

सुशीबेन शाह म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे दोन दिवसीय नाशिक विभागाची सुनावणी, प्रशिक्षण व आढावा बैठक घेण्यात आली. गुन्हा नोंदणी हा एकमेव बाल विवाह रोखण्यासाठी एकमेव पर्याय आहे का. लग्न मोडले तर पीडित मुलामुलीचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. आश्रमशाळा एकमेव पर्याय आहे का. मतिमंद व गतिमंद मुलांसाठी काय करता येईल, यावर बैठकीत चर्चा झाली.

- Advertisement -

ग्रामीण भागातील पालकांना मुलांना मजुरीसाठी न पाठवता, मुलांना आश्रमशाळेत ठेवण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी मुलांचे पालनपोषण केले जाते. शिवाय, पालकांना आर्थिक मदत केली जाते. पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत दिवाळीनंतर बैठक घेतली जाईल. त्यावेळी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जाईल. बालस्नेही महाराष्ट्रसाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. यावेळी सायली पालखेडकर, चैतन्य पुरंदरे, चंद्रशेख पगारे, अजय फडोळ आदी उपस्थित होते.

काय म्हणाल्या सुशीबेन शाह
  • बालविवाह, बालमजुरी व बालगुन्हेगारी रोखण्यासाठी बालरक्षक तयार केले जातील. बालरक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  • जर मुलांना तक्रार देण्यासाठी शल्टर होममध्ये तक्रार पेटी ठेवली जाईल. तक्रार मिळताच कारवाई केली जाईल.
    पीडित मुलामुलींना कोर्टात न भेटता सुसंवादासाठी जागा असली पाहिजे.]
  • महसूल विभागात निधी पडून आहे. तो मुलांसाठी वापरला गेला पाहिजे. त्यातून बाल हक्क उद्यान, बालभवन उभारले जावे. मुलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले गेले पाहिजे.
  • नशामुक्तीसाठी अन्न व औषध प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणालाही औषधे देवू नयेत.
  • जिल्ह्यात तीन महिन्यानंतर चाईल्ड फ्रेंडली वातावरण तयार होईल. थिंक आऊट ऑफ द बॉक्स करत कामकाज करा, अशा संबंधित व्यक्तींना सूचना दिल्या आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -