घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपावसाच्या परतीला दिवाळीचा मुहूर्त; गुरवारी होणार आकाश मोकळे

पावसाच्या परतीला दिवाळीचा मुहूर्त; गुरवारी होणार आकाश मोकळे

Subscribe

नाशिक : परतीच्या पावसाने सलग दुसर्‍या दिवशी तुफान बॅटींग करत नाशिककरांना झोडपून काढले. या पावसामुळे दिवाळीच्या उत्साहावर पाणी फेरले गेल्याने खरेदीसाठी घराबाहेर पडलेले नागरिक आणि व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत २१ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

नाशिकसह मध्य महाराष्ट्रातील खान्देशपासून ते सिंधुदूर्ग कोल्हापूर परिसरात तीन दिवस म्हणजे १९ ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळेे यांनी वर्तविला आहे. त्यामुळे पावसाची पुन्हा धुवाँधार बॅटींग होणार आहे. मंगळवारी झालेल्या पावसाने रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. पावसाच्या तडाख्याने शेतीमालाचे देखील मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. आज सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते मात्र दुपारी ऊन पडल्याने व्यावसायिकांना हायसे वाटले. मात्र दुपारी ३ वाजेनंतर अचानक ढग दाटून आले. दुपारी ४ नंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडणार्‍यांचा हिरमोड झाला. दिवाळीनिमित्त शहरासह उपनगरांत बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. व्यापार्‍यांनीही यंदा अधिकचा माल खरेदी केला आहे. तर पणत्या, आकाशकंदिल विक्रेत्यांनी बाजारपेठ सजली आहे.

- Advertisement -

अनेक लहान विक्रेत्यांनी रस्त्यावर दुकाने थाटली असून दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे साहित्य खराब होऊ नये याकरीता माल झाकण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ उडाली. अनेक विक्रेते हे ग्रामीण भागातून आले असून या विक्रेत्यांचे हाल झाले. दरम्यान यंदा यापूर्वी शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच काही भागात अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले, पिके खराब झाल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. या संकाटातून सावरल्यानंतर पुन्हा एकदा काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -