घरमहाराष्ट्रनाशिकएसटी प्रवासात तरुणाच्या श्वासनलिकेत अडकले नाणे

एसटी प्रवासात तरुणाच्या श्वासनलिकेत अडकले नाणे

Subscribe

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराने मिळाले जीवदान

नाशिक : एसटी प्रवासात तरुणाने वाहकाकडे तिकीटाचे पैसे देत असताना १० रुपयांचे नाणे ्नवधानाने गिळल्याने ते त्याच्या श्वासनलिकेत अडकले. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. संजय गांगुर्डे, डॉ. उन्मेष वरवंडकर व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या उपचार करीत नाणे बाहेर काढले. त्यामुळे तरुणाला जीवदान मिळाले आहे.

मोखाडा (जि.ठाणे) येथील नरेश नारायण सुपे (वय २१) हे शुक्रवारी (दि.२८) सकाळी एसटी बसने प्रवास करत होते. ते वाहकांचे तिकिटाचे पैसे देत होते. त्यावेळी १० रुपयांचे नाणे अनावधानाने श्वासनलिकेत अडकले. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. सुरुवतीला त्याला उपचारार्थ मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारार्थ त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

ही बाब जिल्हा रुग्णालयातील कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. संजय गांगुर्डे यांना समजली. त्यावेळी त्याची आणखी प्रकृती खालावली होती. डॉ. गागुर्डेव डॉ. वरवंडकर यांनी त्याच्या तपासणी करुन घशाचे एक्सरे काढल्यानंतर त्याला शुक्रवारी (दि.२८) सकाळी ११ वाजेदरम्यान ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल केले. त्याला पूर्ण भूल दिल्यानंतर त्याच्या श्वासनलिकेत अडकलेले रुपयाचे नाणे दुर्बिणेव्दारे बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे नरेशला जीवदानच मिळाले. डॉ. संजय गांगुर्डे यांच्यासह भूलतज्ज्ञ डॉ. सचिन पवार, ऑपरेशन थिएटरच्या परिचारिका लता परदेशी, कडवे, बर्वे यांचे पालकांनी आभार मानले. तसेच, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास, डॉ. निखील सैंदाणे आदींनी डॉ. गांगुर्डे व त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -