घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यातील बालसंगोपन संस्थांवर जिल्हाधिकार्‍यांची करडी नजर; माहिती मागवली

जिल्ह्यातील बालसंगोपन संस्थांवर जिल्हाधिकार्‍यांची करडी नजर; माहिती मागवली

Subscribe

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील बालकाची हत्या, हिरावाडी येथील आश्रमातील अत्याचार प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली असून, जिल्ह्यातील बालसंगोपन करणार्‍या सर्व संस्थांची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मागविली आहे. नोंदणी नसलेल्या संस्थांबाबत कठोर निर्णयाचे संकेत त्यांनी दिले आहेत.

गेल्या आठवड्यात त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आधाराश्रमात चार वर्षांच्या बालकाची गळा आवळून हत्या करण्यात आली. आलोक विशाल शिंगारे (वय ४ वर्षे, रा. उल्हासनगर, कल्याण) या बालकाच्या खूनाची घटना उघडकीस आली होती. गळा आवळून हा खून करण्यात आला. या प्रकरणात साडेतेरा वर्षांच्या मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या विद्यार्थ्याने ईर्षेतून व किरकोळ कारणातून हे दुष्कृत्य केल्याची माहिती तपासात पुढे आली. पाठोपाठ म्हसरूळच्या ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील सहा विद्यार्थिनींवर आश्रमातच नाही, तर बाहेरही लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

- Advertisement -

संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे (वय ३२) याला पोलिसांनी अटक केली आहे. २०१८ पासून पीडित विद्यार्थिनींचे शोषण सुरू असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या दोन्ही घटनांचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मागवला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात महिला बालकल्याण विभाग आणि पोलिसांकडून याबाबत अहवाल सादर करण्यात आला. मात्र, हा अहवाल त्रोटक असल्याने प्रशासनाने सविस्तर अहवाल मागवला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या घटनांची गंभीर दखल घेतली असून महिला बालकल्याण विभाग आणि समाजकल्याण विभागाकडून नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत संस्थांची माहिती मागविण्यात आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना घडू नयेत, याकरीता प्रभावी उपाययोजना आवश्यक असून संबंधित विभागांची बैठक बोलावल्याची माहिती गंगाथरन डी. यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -