घरताज्या घडामोडीनाशिक शहर पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव

नाशिक शहर पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव

Subscribe

५ अधिकार्‍यांसह २० पोलीस पॉझिटिव्ह

नाशिक शहर पोलीस दलात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असून, पाच पोलीस अधिकारी व २० पोलीस हवालदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सोमवारी (दि.१५) दिवसभरात एक हजार ३७६ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक शहर ७८८, नाशिक ग्रामीण ४०७, मालेगाव १४९ आणि जिल्ह्या बाहेरील ३२ रुग्णांचा समावेश आहे.

फ्रंटलाईनवर काम करणारेच पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आठ हजार ८६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये नाशिक शहर ६ हजार ७३१, नाशिक ग्रामीण १ हजार ४०८, मालेगाव ६६४ आणि जिल्ह्याबाहेरील ६४ रुग्ण आहेत. नाशिक शहरात ६४४ कोरोना प्रतिबंधित क्षेत्र आहेत. सोमवारी दिवसभरात ५५१ रुग्ण कोरोनामुक्त झाला असून, सहा रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर व नाशिक ग्रामीणमधील प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे. नागसेन नगर, वडाळा, नाशिक येथील ६५ वर्षीय महिला, पदम दर्शन अपार्टमेंट, कामठवाडे येथील ७२ वर्षीय पुरुष आणि श्रीकृष्ण अपार्टमेंट,रविवार कारंजा येथील ९१ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -