घरमहाराष्ट्रनाशिकदारणाऐवजी गंगापूर धरणातून वाढीव पाणी आरक्षणाची मागणी

दारणाऐवजी गंगापूर धरणातून वाढीव पाणी आरक्षणाची मागणी

Subscribe

पाणीपुरवठा विभागाने तयार केला प्रस्ताव

दारणा धरणातून पाणी उचलण्यात येणार्‍या अडचणी विचारात घेता दारणाऐवजी गंगापूर धरणातून आरक्षण वाढवून द्यावे, असा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीने राज्याच्या जलसंपदा विभागाकडे पाठवला जाईल.

नाशिक शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पाणीपुरवठा होतो. पंचवटी, पश्चिम, सातपूर, सिडको विभागात गंगापूर तर सिडको, मध्य नाशिकचा काही भाग इंदिरानगर व पाथर्डी भागात मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका क्षेत्रासाठी दरवर्षी पाण्याचे आरक्षण मंजूर केले जाते. त्यानुसार १५ ऑक्टोबर २०२० ते ३१ जुलै २०२१ या २९० या काळासाठी साडेपाच हजार दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले होते. यात गंगापूर धरण समूहातून ३८००, दारणा धरणातून ४००, तर मुकणे धरणातून १३०० दशलक्ष घनफूट पाणी याप्रमाणे आरक्षण होते. दारणा धरणातून मिळणारे पाणी चेहेडी पंपिंग स्टेशनमधून उचलावे लागते. परंतु, या ठिकाणी संपूर्ण पाणी आरक्षण उचलण्याची पालिकेची क्षमता नाही. यामुळे आयुक्त कैलास जाधव यांनी धरणातील पाणी आरक्षण आणि वापर याचा एकूण आढावा घेतला. त्यात दारणाचे आरक्षण कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दारणा धरणाऐवजी गंगापूर धरणातून दरवर्षी नियमित मिळणार्‍या आरक्षणात २०० ने वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्तांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. तो ‘जलसंपदा’कडे सादर केला जाईल.

- Advertisement -
  • पाणी कपात टाळता येणे शक्य

दारणातील आरक्षित ४०० दलघफू पैकी १९६ दलघफू पाण्याचाच वापर करता आला. यामुळे पाणी कपातीचे संकट ओढावले. चेहेडी पंपिंग स्टेशन येथून पाणी उचलताना अळीयुक्त पाणी येत असल्याने दारणाचे पूर्ण आरक्षित पाणी उचलणे शक्य होत नाही. जर दारणातून आरक्षण वर्ग करून गंगापूरमधून पाणी आरक्षण मिळाल्यास पाणी कपातीचे संकट टाळता येणे शक्य होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -