घरमहाराष्ट्रनाशिकमेडीकल प्रवेशासाठी आरोग्य विद्यापीठात कागदपत्र तपासणी केंद्र

मेडीकल प्रवेशासाठी आरोग्य विद्यापीठात कागदपत्र तपासणी केंद्र

Subscribe

नाशिक, जळगाव, धुळे व जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संधी

राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात ‘नीट’ परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र विद्यार्थ्यांचे कागदपत्र तपासणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे. प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांची पडताळणी करणे अनिवार्य असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कागदपत्र पडताळणी करण्याचे आवाहन कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी केले आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमातील विविध विद्याशाखांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रक्रिया राबवली जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ परीक्षेच्या आधारे ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच नाशिक येथे विद्यापीठ आवारात राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा ‘नीट‘ संदर्भांत कागदपत्र पडताळणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रातंर्गत नाशिक, धुळे, जळगाव व जालना जिल्हाचा काही भाग समाविष्ट असून या भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यात नाशिकसह मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेज, पोदार आयुर्वेदिक कॉलेज, वरळी, पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेज, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय कॉलेज, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय कॉलेज, नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, नागपूर येथील शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक कॉलेज या ठिकाणी कागदपत्र पडताळणी केंद्र सुरु आहेत.

शुक्रवारी अंतिम मुदत

आरोग्य विद्यापीठ केंद्रात सुमारे एक हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणी करण्यात आली आहे. कागदपत्र पडताळणीसाठी शुक्रवार (दि.5) रोजी अंतिम मुदत असल्याने विद्यार्थ्यांनी वेळीच तपासणी करुन घ्यावी. अद्याप दोन हजारांवर विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी होणे अपेक्षित असल्याचे कागदपत्र पडताळणी केंद्राचे प्रमुख तथा उपकुलसचिव डॉ. उदयसिंह रावराणे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -