घरमहाराष्ट्रनाशिकपाच एकर द्राक्षबागेची ड्रोनद्वारे फवारणी

पाच एकर द्राक्षबागेची ड्रोनद्वारे फवारणी

Subscribe

देशातील पहिलाच प्रयोग दिंडोरी तालुक्यातील बहादुरी येथे

नाशिक : द्राक्ष उत्पादकांच्यादृष्टिने डावणीचा हंगाम अत्यंत महत्वाचा समजला जातो आणि या काळात फवारणीला अनन्यसाधारण महत्व असते. परंतु, पारंपारिक पध्दतीने फवारणी करण्यापेक्षा ड्रोनच्या सहायाने पाच एकर द्राक्षबागेची फवारणी करण्याचा देशातील पहिलाच प्रयोग दिंडोरी तालुक्यातील बहादुरी येथील प्रयोगशील शेतकरी नीलेश वाटपाडे यांच्या शेतात पार पडला.

महिंद्रा प्रिसिजन फार्मिंग यांच्या बँगलोर येथील टिमने रविवारी (दि.17) दिंडोरी तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी म्हणून नीलेश वाटपाडे यांचे नाव आहे. त्यांच्यासोबत सुमीत धुमाळ व समाधान तिडके, गावचे सरपंच बापू शिरसाठ यांच्या साक्षीने हा प्रयोग यशस्वी केला. 10 लिटर क्षमतेचा या ड्रोनला सहा विविध प्रकारचे नोझेल आहेत. त्या माध्यमातून औषधांची मात्रा योग्य प्रमाणात पोहोचते की नाही, याची चाचपणी घेण्यात आली. विशेष म्हणजे ड्रोनद्वारे केलेल्या फवारणीमुळे औषधांची बचतही होत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात त्याचा वापर अधिक प्रमाणात केला जाऊ शकतो. विशेष प्रकारचे हे ड्रोन कंपनीने स्वत:च्या खर्चातून आणलेले असल्यामुळे शेतकर्‍यांपर्यंत त्याची किंमत पोहोचलेली नाही. देशातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्याप्रकरणी महिंद्रा कंपनीने आपला अहवाल वरिष्ठांना दिला आहे. त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या दृष्टिने हा प्रयोग प्रयोग महत्वाचा मानला जात आहे. यापूर्वी सेंसर टेक्नॉलॉजीद्वारे भारतातील द्राक्षांचे फोटो अमेरिकेत पाठवण्यात आलेले होते.

द्राक्ष उत्पादकांच्या दृष्टिने योग्य वेळी आणि अचूक फवारणीला प्रचंड महत्व आहे. ही फवारणी ड्रोनद्वारे होऊ शकते का? याची चाचपणी घेण्यात आली. प्रायोगीक तत्त्वावर ही चाचणी यशस्वी झालेली दिसते. शेतकर्‍यांसाठी हा प्रयोग अत्यंत महत्वाचा आहे.
– अरविंद शिरसाठ,कृषी कायदे विपणन व्यवस्था व कृषी अभ्यासक

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -