घरमहाराष्ट्रनाशिकबघा अशी असेल नाशकात धावणारी इलेक्ट्रिक बस...

बघा अशी असेल नाशकात धावणारी इलेक्ट्रिक बस…

Subscribe

आपलं महानगरचा विशेष वृत्तांत: मेट्रो ट्रेनसारख्या अंतर्गत सुविधा एकावेळी ६० प्रवाशांना इलेक्ट्रिक बसमधून करता येणार प्रवास

५५ इंच खिडकीच्या चकचकीत काचांमधून घडणारे नाशिकचे घडणारे दर्शन.. अतिशय आरामदायी खुर्च्या.. वातानुकूलीत यंत्रणा.. मेट्रोच्या धर्तीवरील हँडल्स.. प्रत्येक बस थांब्यावर होणारी उद्घोषणाआपत्कालीन परिस्थितीत बस थांबविण्यासाठी लावलेले पॅनिक बटन्स.. अशी अंतर्गत रचना असलेल्या बसेस नाशिकच्या रस्त्यांवरुन येत्या चार महिन्यांत धावणार आहेत. बसमधील आसनक्षमता ३९ एवढी असली तरीही उभे राहणार्‍यांना गृहीत धरुन ६० प्रवाशांना या बसमधून एकावेळी प्रवास करता येणार आहे. मेट्रो ट्रेनमध्ये दिल्या जाणार्‍या सुविधांशी मिळतीजुळती अंतर्गत रचना या बसची आहे. या बसमधून ‘आपलं महानगर’ प्रतिनिधीने प्रवास करुन तांत्रिक बाजू जाणून घेतल्या. त्याचा हा विशेष वृत्तांत

इलेक्ट्रिक बस तशी चांगली; पण ऑनस्ट्रीट पार्किंगने मारली

इलेक्ट्रिक बस तशी चांगली; पण ऑनस्ट्रीट पार्किंगने मारली..

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 17, 2019

- Advertisement -

या बसेसच्या निविदांना अंतीम स्वरुप देण्यापूर्वी ही बस किती व्यवहार्य आहे, कोणत्या त्रुटी दूर करण्याची गरज आहे याच्या तपासणीसाठी दोन दिवसांपासून बसची नाशिकमध्ये चाचणी सुरू आहे. ही बस बॅटरीवर चालत असल्याने नियमित बससारखा घरघर वा खडखडाट करणारा आवाज येत नाही. बसमध्ये हायड्रोलिक सस्पेन्शन असल्याने ती खड्ड्यांमधून फारशी उधळतदेखील नाही. एरव्ही बसच्या मागील बाजूला अधिक धक्के बसतात. मात्र, या बसचे मागील सीट्स हे उंचावर आहेत. त्यामुळे मागील बाजूस बस उधळत नाही. एखाद्या लक्झरी बससारखी अंतर्गत व बाह्यरचना आहे. प्रवाशांना उभे राहण्यासाठीदेखील मोकळी जागा आहे. जीपीएस प्रणालीव्दारे आपल्या मार्गावरील बस सध्या कोठे आहे हे प्रवाशाला मोबाइलवर दिसू शकते. आणीबाणीच्या क्षणी खिडकीच्या काचा फोडण्यासाठी हातोड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

रस्त्यांच्या रचनेनुसार नोंदवली जाईल मागणी

इलेक्ट्रीक बसेसच्या व्यवहार्यता चाचणीनंतर निविदेला अंतीम स्वरुप प्राप्त होऊन त्यानंतर शहरातील रस्त्यांच्या रचनेनुसार बसेसची संबंधित कंपनीकडे मागणी नोंदवली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेला साधारणत: चार महिन्यांचा कालावधी लागेल असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

लक्षवेधी मुद्दे

  • एकदा चार्ज केल्यावर सलग २३५ किलोमीटर धावू शकेल.
  • बॅटरी चार्ज होण्यासाठी साडेचार तास लागतात.
  • बसचालक ज्या जय वेळी ब्रेक दाबेल, त्यात्या वेळी ऊर्जा निर्माण होऊन बॅटरी चार्ज होईल.
  • चढावर ब्रेक दाबला नाही तरी बस पाठिमागे येणार नाही
  • लहान रस्त्यांवर नऊ मीटरच्या बसेसचा पर्याय

बसमध्ये सध्या प्रवाशी नसल्याने चाचणीसाठी १८ टन वजनाच्या वाळूच्या गोण्या टाकण्यात आल्या आहेत. आम्ही गुरुवारी एकदा चार्जिंग केल्यावर १४ तास सलग बस चालवली. त्यात २०० थांब्यांवर बस थांबली. साधारणत: २३५ किलोमीटर इतकी बस चालली. तरीही ३६ टक्के बॅटरी शिल्लक होती. म्हणजे एकदा चार्जिंग केल्यावर ही बस ३३५ किलोमीटरपर्यंत विनाअडथळा धावू शकते. एकदा चार्जिंग केल्यावर नाशिकच्या रस्त्यांवरुन दररोज १८ तास बस चालवण्यास हरकत नाही, असा निष्कर्ष आम्ही दोन दिवसांत काढला आहे. – शेखर ढोले, प्रमुख अधिकारी, सेफ्टी अ‍ॅण्ड होमोलॉजीशन डिव्हिजन व्हेईकल सर्टीफिकेशन, सीआयआरटी

अशा येतील ४५० बसेस

१५०इलेक्ट्रीक

२००सीएनजी

५०डिझेल बस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -