घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक शहरात गोवरची एण्ट्री; ४ संशयित रूण

नाशिक शहरात गोवरची एण्ट्री; ४ संशयित रूण

Subscribe

महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट, झाकीर हुसेन रूग्णालयात २० खाटांचा वॉर्ड सज्ज

नाशिक : मुंबई, मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरात गोवरचे चार संशयित रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून महापालिकेचा आरोेग्य विभाग अर्लट झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात २० खाटांचा स्वतंत्र कक्ष सज्ज करण्यात आला आहे.

प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळणारा गोवरचा आजाराने हात पसरवण्यास सुरवात केली आहे. मुंबई शहरात सुरवातीला आढळून आलेल्या रुग्णानंतर मालेगाव शहरात गोवरचे संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आता नाशिक शहरात गोवरचे चार संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यामुळे महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना देखील सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये 50 हुन अधिक संशयित रुग्ण आढळून आले होते.

- Advertisement -

मात्र, नाशिक शहरात एकही रुग्ण आढळला नव्हता. आता मात्र चार संशयित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान रिपोर्ट आल्यानंतर आरोग्य विभाग शहरात सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे रुग्ण संशयित असले तरी नागरिकांनी बालकांच्या बाबतीत खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर गोवर झाल्यासारखे वाटले तर त्वरित उपचार घ्यावेत, मुलांना शाळेत पाठवू नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.तसेच प्रतिबंधक उपाययोजना म्हणून डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येउन औषणांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जर बाळाला सौम्य लक्षणे असतील तर उपचार करून घरीही आयसोलेशनमध्ये ठेवता येउ शकते परंतु यात जर गंभीर लक्षणे असतील तर निमोनिया होण्याचा धोका असतो याकरीता आरोग्य विभाग सज्ज आहे. कोणतेही लक्षणे आढल्यास पालकांनी बालकांना शाळेत पावू नये असे आवाहन बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -