घरमहाराष्ट्रनाशिकमाजीमंत्री भुजबळांचे येवल्यात जोरदार स्वागत

माजीमंत्री भुजबळांचे येवल्यात जोरदार स्वागत

Subscribe

नाशिक :ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याचा निर्णय कोर्टाने दिल्यानंतर माजीमंत्री छगन भुजबळ हे नाशिक जिल्हा दौर्‍यावर आहेत. रविवारी (दि. २४) ते येवला मतदार संघाच्या दौर्‍यावर असताना त्यांचे मतदासंघात विविध ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.

प्रारंभी विंचूर येथे व त्यानंतर येवला संपर्क कार्यालय येथे आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, ढोल-ताशे वाजवत जल्लोषात स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांकडून मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भुजबळ यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, नायब तहसीलदार पंकजा मगर, सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी, माजी नगरसेवक प्रवीण बनकर, दीपक लोणारी, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष अकबर शहा, सचिन कळमकर, संतोष खैरनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पीक कर्जवाटपाचा आढावा

- Advertisement -

तालुक्यातील खरीप पीक कर्ज वाटपासह विविध विकास कामांचा छगन भुजबळ यांनी बैठकी दरम्यान आढावा घेतला. यावेळी उर्वरित शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटप तातडीने करण्यात यावे. सुरू असलेली विविध विकास कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी मतदारसंघातील पर्जन्यमानाचा देखील आढावा घेतला.
यावेळी येवला येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, संजय बनकर, महेंद्र काले, बाळासाहेब गुंड, हुसेन शेख, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष अकबर शहा, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दीपक लोणारी, दत्ता निकम, मुश्ताक शेख, निसार निंबुवाले, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ, मोहन शेलार, अशोक संकलेचा, संतोष खैरनार, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, भूषण लाघवे, भाऊसाहेब धनवटे, भगवान चित्ते, सचिन कळमकर, ज्ञानेश्वर कदम, बाळासाहेब दाणे, नवनाथ काळे, साहेबराव आहेर, संतोष सोमासे, ए. ए. शेख, गोरख पवार, गोटू मांजरे, मकरंद सोनवणे, गोरख शिंदे, प्रवीण पहिलवान, प्रल्हाद पाटील, डॉ. प्रविण बुल्हे, ज्ञानेश्वर कदम, बाळासाहेब रोठे, विश्वास देवरे, संतोष राऊळ, कोंडाजी कदम, मुकेश सोळशे, समीना शेख, हेमलता गायकवाड, निर्मला थोरात, विमल शहा, शफीक शेख, अविनाश कुक्कर, विजय खोकले, अनिल दारुंटे, रवी जगताप, श्याम बावचे, प्रशांत पानपाटील आदी उपस्थित होते. तर विंचूर येथे सरपंच सचिन दरेकर, विलास गोरे, आत्माराम दरेकर, रणजित दादा गुंजाळ, जयंत साळी, मोसिन शेख, इस्माईल मोमीन, गोविंद हिरे, वाल्मीक शोधक, भाऊराव सांगळे, सचिन सरोदे, माधव जगताप, रत्नाकर दरेकर, प्रकाश काकड, अमजद पठाण, अनिल पुंड, रवींद्र खैरे, स्वप्निल आव्हाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -