घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअप्पर वैतरणा धरण ओव्हर-फ्लो

अप्पर वैतरणा धरण ओव्हर-फ्लो

Subscribe

देवगाव : मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्वाचे अप्पर वैतरणा धरण ८० टक्के भरले असून रविवारी (दि. २४) ओव्हर फ्लो झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले तर मुंबईकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून मुंबईकरांची तहान भागणार आहे. एक सांडव्याचे एक फुट गेट उचलत ६१० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला असून कालव्याद्वारे ४०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. धरण भरल्याने मुंबईकरांसह वैतरणा परीसरातील नागरिक व शेतकर्‍यांची अखेर चिंता मिटली आहे.

जुलै महिन्यात धरणक्षेत्रात मुसळधार पावसासह संततधार सुरू असल्याने आज अखेर अप्पर वैतरणा धरण दुपारी दोन वाजता ओहर फ्लो झाले असून ८९ टक्के भरल्याने सांडव्याद्वारे ६१० क्युसेकने तर कालव्याद्वारे ४०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. दरम्यान, धरणक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असून धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच आहे. धरणक्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यास सांडव्याद्वारे आणखी विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो असा अंदाज असून त्यादृष्टीने वैतरणा पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी १ निलेश वन्नेरे, शाखा अभियंता योगेश निकुंबे आदींसह कर्मचारी लक्ष ठेवून असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

- Advertisement -

अप्पर वैतरणा धरण परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षीत करत असतो. मागीलवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात परिसराकडे पाठ फिरवली होती मात्र थोड्याफार प्रमाणात पर्यटक येत आहेत. अप्पर वैतरणावर मात्र यावर्षी पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असून डोंगरदर्‍यांवरून कोसळणारे पाणी मोठ्या प्रमाणात असून छोटे-मोठे अनेक धबधबे बघायला मिळतात. परिसरात धबधब्यांसह धुके व संपूर्ण परिसर हिरवामय झाल्याने या परिसराचे आकर्षण कायम असते.

पाणी पातळी : १९७९.६५ फूट
उपयुक्त पाणी साठा : ३२७.०६ द.ल.घ.मी.
एकूण पाणी साठा : ३४९.७१ द.ल.घ.मी.
टक्केवारी : ८९%

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -