घरक्राइमआप मधील गटबाजी थेट मारहानीपर्यंत; सोशल मीडियाप्रमुख शिलेंद्र सिंग यांना मारहाण

आप मधील गटबाजी थेट मारहानीपर्यंत; सोशल मीडियाप्रमुख शिलेंद्र सिंग यांना मारहाण

Subscribe

नाशिक : ‘आप’च्या ग्रुपवर नाव घेऊन कमेंट केल्याच्या कारणातून तीन जणांनी एका युवकास शिवीगाळ, मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिलेंद्रपाल मोहनलाल सिंग यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आपचे पश्चिम विभागाचे समनव्यक योगेश कापसे, आप युवा आघाडीचे अध्यक्ष अमर गांगुर्डे, मध्य विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिलेंद्रपाल सिंग व संशयित आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सिंग शनिवारी (दि.२२) रात्री १०. १५ वाजेदरम्यान जयभवानीरोड येथे असताना संशयित तिघे त्यांच्याजवळ आले. संशयित योगेश कापसे याने तू आम आदमी पक्षाच्या ग्रुपवर अपलोड केलेल्या पोस्टवर नाव घेऊन कमेंट का केली, असे म्हणत कुरापत काढली. त्यानंतर तिघांनी संगनमत करत सिंग यांना शिवीगाळ करत मारहाण करुन दमदाटी केली. पुढील तपास पोलीस नाईक शेख करत आहेत.

- Advertisement -
‘आप’कडून माफीनामा 

आपचे समनव्यक योगेश कापसे, आप युवा आघाडीचे अध्यक्ष अमर गांगुर्डे, मध्य विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप लोखंडे या तिघांनी सिंग यास परप्रांतीय असल्याच्या रागातून सोशल मीडियावर चुकीची प्रतिक्रिया का दिली? याचा जाब विचारत घरात घुसून मारहाण केली. ही घटना निषेधार्ह आहे. पक्षातील उपद्रवी व गुंडप्रवृत्तीच्या लोकांच्या कुकृत्याबद्दल आम्ही आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते जनतेची क्षमा मागतो, असे समाधान अहिरे यांनी स्पष्ट केले आहे.

आप’मध्ये दोन गट 

आम आदमी पार्टी हा पक्ष दिल्ली, पंजाब मधील सत्ता काबीत केल्यानंतर त्यांनी गोवा, गुजरात राज्यातही चांगले यश मिळवले. यानंतर आता, आपचे लक्ष महाराष्ट्रावर आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय पक्षाची शाखा नाशिकमध्ये असल्याचे दिसून येते. मात्र, नाशिक शहरात उघड उघड दोन गट निर्माण झालेले आहेत. त्यांच्यात सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमकी होताना दिसतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -