Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन समोर साक्षात सनी देओल बघून शेतकरी चक्रावला; म्हणतोय  तू तर...

समोर साक्षात सनी देओल बघून शेतकरी चक्रावला; म्हणतोय  तू तर…

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. अशातच सनी देवोलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात सनी देओल एका शेतकऱ्याशी गप्पा मारतो मात्र तो शेतकरी समोर असलेल्या सनी देओलला ओळखू शकला नाही. तो शिवाय तो शेतकरी सनी देओलला तुम्ही सेम सनी देओल सारखे दिसता असं देखील म्हणतो. सनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

खरं तर, सनी देओल आणि त्याची टीम महाराष्ट्रातील अहमदनगरमधील एका खेड्यात बैलगाडी चालवणाऱ्या एका माणसाला थांबवत आहेत. व्हिडिओमध्ये कोणीतरी त्या व्यक्तीला विचारले आहे की तो हातगाडीवर काय घेऊन जात आहे. त्या माणसाने उत्तर दिले की, त्याच्याकडे जनावरांसाठी ज्वारीची भुशी आहे. यानंतर सनी तिथे हजर झाला आणि त्या व्यक्तीसोबत गप्पा मारु लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

- Advertisement -

त्यानंतर सनीने त्याला तू कुठे जात आहेस असे विचारले त्यावर तो व्यक्ती त्याला म्हणाला की, ‘तू सनी देओलसारखा दिसतोस.’ सनी हसला आणि म्हणाला, ‘हो, मी सनी देओलच आहे.’ सनी देओलला भेटून तो माणूस आश्चर्यचकित झाला आणि ‘अरे बाप रे’ असं म्हणाला.

दरम्यान, हा व्हिडीओ अहमदनगरमधील असून ‘गदर 2’च्या शूटिंगदरम्यानचा आहे. सध्या सनी देओलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकजण त्यावर कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

खऱ्या अर्थाने मला स्वातंत्र्याचा अर्थ कळला… तुरुंगातून बाहेर आल्यावर शीझानची प्रतिक्रिया

- Advertisment -