घरमहाराष्ट्रनाशिकबागायती जमिनी सात-बार्‍यावर जिरायती, शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

बागायती जमिनी सात-बार्‍यावर जिरायती, शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Subscribe

सूरत-चेन्नई महामार्ग : प्रशासनाचा अजब कारभार, शेतकरी संतप्त 

 नाशिकरोड : सूरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग देवळाली मतदार संघातील आडगाव, विंचूर गवळी, लाखलगाव व ओढा गावांतून जात आहे. या मार्गात येणार्‍या जमिनी बागायती व व्यावसायिक असतांना उतार्‍यावर जिरायती जमिनींचा उल्लेख असल्याने चार गावांतील शेतकर्‍यांनी या प्रकल्पास तीव्र विरोध केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात याप्रकरणी शुक्रवारी (दि.26) झालेल्या बैठकीत आमदार सरोज आहिरे यांनी शेतकर्‍यांची बाजू ठामपणे मांडली. बाधित शेतकर्‍यांना भुसंपादनाबाबत मोबदला, तीन ए नोटिफिकेशनमध्ये राजपत्रात या जमिनी जिरायती दाखवल्या आहेत. संपादीत जमिनीत द्राक्ष बागा, फळझाडे, इमारती, विहीरी, तळे, घर, गोठा, इलेक्ट्रिक कनेक्शन, विद्युत पोल, बोअरवेल, पाईपलाईन याबाबत स्वतंत्र खुलासा करुन त्यांची भरपाई रक्कम शेतकर्‍यांना अदा केल्याशिवाय शासनाने जमीनीचा कब्जा घेऊ नये अशी विनवणी शेतकर्‍यांनी केली. बैठकीला कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश शिंदे, अ‍ॅड. बस्ते, अ‍ॅड. गोवर्धने, विनायक कांडेकर, भरत जाधव, तानाजी जाधव, प्रभाकर कांडेकर, गणेश ढिकले, बहिरू जाधव, शिवा जाधव, बापू आहेर, प्रशांत आहेर, अशोक जाधव, भाऊराव शिंदे, एकनाथ शिंदे, बापू सानप, कांतिलाल बोडके, रावसाहेब गोहाड उपस्थित होते.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -