घरमहाराष्ट्रनाशिकआषाढी एकादशीचा उपवासही महागला

आषाढी एकादशीचा उपवासही महागला

Subscribe

नाशिक : आषाढी एकादशी हा दिवस वारकरी संप्रदायातील सर्वात महत्वपूर्ण दिवस तसेच महाराष्ट्रात आषाढी एकादशी म्हणजे आध्यात्मिक उत्सवाचा दिवस मानला जातो. आषाढी एकडशी निमित्त राज्यभरात एक उत्साहाचे वातावरण असते. मोठ्या संख्येने आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यादिवशी करण्यात येते. आषाढी एकादशीची आणखी महत्वाचे परंपरा म्हणजे या दिवशी बहुसंख्य मराठी बांधव उपवास करतात. मात्र, यंदा या उपवासालाही महागाईचा फटका बसताना दिसून येत आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक शहरासह जिल्ह्याभरातील विठ्ठल तसेच इतर मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये मुख्यत्वे फराळाच्या पदार्थांचेही वाटप केले मोठ्या प्रमाणात केले जाते. तसेच, घराघरात उपवास केला जात असल्याने किरकोळ बाजारात साबूदाणा, शेंगदाणा, राजगिरा, खजूर आणि फळांच्या मागणीमध्ये वाढ होत असते. रोजच्या स्वयंपाकासह उपवासात मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा शेंगदाण्याचा भाव मागील दिवसांपासून गगनाला भिडला आहे. तर इतरही पदार्थांचे भाव वधारले आहेत.

- Advertisement -

मागील काही दिवसापर्यंत ६० ते ६५ रुपये प्रतिकिलोने विक्री होणारा साबूदाणा आषाढी एकादशीच्या तोंडावर ७० ते ७५ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. शेंगदाणा आणि साबुदाणा यांच्या तुलनेत मागणी कमी असूनही ११० रुपये किलोने मिळणारी भगर आता १२० ते १२५ रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. यासोबत दरात मोठी वाढ झालेले शेंगदाणेही १३० ते १४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत.

फळे आणि भाजीपाल्याची मोठी मागणी मात्र पुरवठा कमी 

उपवासाच्या दिवशी इतर पदार्था सोबतच उपासकरू फळांच सेवतही मोठ्या प्रमाणात करतात. यामध्ये केळी, चिकू, पपई, सफरचंद, संत्री यासोबत हंगामातील फळ म्हणून आंब्याकडेही मोठा ओढा असतो. मात्र, आंबा वगळता इतर सर्व फळांची बाजारातील आवक मागणीच्या दृष्टिकोनातून फारच कमी असल्याचे बघायला मिळत आहे. फळांसोबतच फराळचे पदार्थ बनवण्यासाठी मिरची, कोथिंबीर यांचीही गरज पडते. मात्र, फळे आणि भाजीपाला बाजारात लांबलेल्या पावसामुळे मालाची आवक घटल्यामुळे भाव मोठ्या प्रमाणात वधारल्याचे बघायला मिळत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -