घरमहाराष्ट्रनाशिकसमीर भुजबळ यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

समीर भुजबळ यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Subscribe

गिसाकानगर मधील आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चर कंपनीला लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी दाभाडीचा तलाठी व कंपनीचे संचालक माजी खासदार समीर मगन भुजबळ यांच्याविरोधात छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील दाभाडी येथील गिसाकानगर मधील आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चर कंपनीला लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी दाभाडीचा तलाठी व कंपनीचे संचालक माजी खासदार समीर मगन भुजबळ यांच्याविरोधात छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

दाभाडी येथील शिवाजी सिताराम पाटील (वय ४८) या शेतकर्‍याने याबाबत फिर्याद दिली आहे. दाभाडी शिवारातील शेतजमीन पाटील यांची आई निंबाबाई यांची वडिलोपार्जित आहे. या जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर इतर अधिकारात त्यांचे नाव समाविष्ट आहे. दरम्यान, दाभाडीचे तलाठी पी. पी. मोरे यांनी भुजबळ यांच्या सांगण्यावरून शेतगट नंबर १२०/७९९ च्या सातबारा उतार्‍यावर जुलै २०१४ मध्ये एकाच महिन्यात पडित व पीकपेरा, असा वेगवेगळा शेरा मारुन तो अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला. तलाठ्याने आर्थिक फायद्यासाठी अधिकाराचा गैरवापर करुन सरकारी कागदपत्रात फेरफार केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी महसूल विभागाने केलेल्या चौकशीत तलाठी मोरेवर दोषारोप सिद्ध झाले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनंतर सीआरपीसी १५६ (३) अन्वये छावणी पोलीस ठाण्यात तलाठी मोरे व कंपनीचे संचालक समीर भुजबळ यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. के. आखाडे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -