घरमहाराष्ट्रनाशिकशपथपत्रातील सर्व रकाने न भरल्यास अर्ज बाद

शपथपत्रातील सर्व रकाने न भरल्यास अर्ज बाद

Subscribe

उमेदवारी अर्ज भरण्याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना केले मार्गदर्शन

नाशिक निवडणुकीसाठी उमेदवाराने अर्ज भरताना शपथपत्रातील सर्व रकाने भरणे बंधनकारक आहे, अन्यथा अर्ज बाद होईल, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या. उमेदवारी अर्ज भरण्याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेत मार्गदर्शन केले.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास २ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. अर्ज भरताना उमेदवाराने शपथपत्रामध्ये गुन्ह्यांबाबत, मालमत्ता देणी, शैक्षणिक अर्हतासोबत त्यांचे सोशल मीडियावरील अकाउंटची माहिती भरणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी अर्जासोबत अनामत रक्कम रुपये २५ हजार व अनुसूचित जातीचा किंवा जमातीचा उमेदवार असल्यास अनामत रक्कम १२ हजार ५०० व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करताना स्वत:च्या नावे असलेल्या बँकेचा तपशील सादर करून या बँक खात्यातूनच उमेदवाराने निवडणूक विषयक खर्च करणे बंधनकारक राहील. नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार विहित प्रपत्रातील प्रपत्र २६ चे शपथपत्र शपथबद्ध करणे आवश्यक आहे. शपथपत्रातील सर्व रकाने भरणे आवश्यक असून, कोणताही रकाना रिक्त ठेवू नये, अशा सूचना करण्यात आल्या.

- Advertisement -

एकास चार अर्ज

एक व्यक्ती जास्तीतजास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करू शकते. तसेच एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज सादर करू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -