घरमहाराष्ट्रनाशिकअपघात झाल्याचं पाहताच पालकमंत्री उतरले रस्त्यावर

अपघात झाल्याचं पाहताच पालकमंत्री उतरले रस्त्यावर

Subscribe

वणीहून परतताना वाहतूकही केली सुरळीत

नाशिक – वणीच्या सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतल्यानंतर परतताना पालकमंत्री छगन भुजबळांनी अपघात झाल्याचे दिसताच थेट रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली. दिंडोरी रस्त्यावर मालवाहतूक करणार्‍या वाहनाचा अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

पालकमंत्री छगन भुजबळांनी सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी गुरुवारी हजेरी लावली. वणी येथील दर्शन कार्यक्रम आटोपून भुजबळ परतीच्या प्रवासाला निघाले. तेव्हा दिंडोरी रस्त्यावर मालवाहतूक करणार्‍या वाहनाचा अपघात झाला होता. घटनास्थळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे लक्षात येताच पालकमंत्री भुजबळांनी आपला ताफा थांबवला. गाडीतून उतरुन त्यांनी तेथील अधिकार्‍यांशी चर्चा केली. वाहतूक सुरळीत करण्याचा सूचना केल्या. स्वतःही मदत केली. खुद्म मंत्रीच रस्त्यावर उतरल्याने काही वेळातच वाहतूक सुरळीत झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -