घरपालघरथकबाकीमुळे नळ पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत

थकबाकीमुळे नळ पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत

Subscribe

विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाडा ग्रामपंचायतीमध्ये विठठल नगर येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल न भरल्याने महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाडा ग्रामपंचायतीमध्ये विठठल नगर येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल न भरल्याने महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे गावकऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे.
वेहेलपाडा येथील विठ्ठल नगर, बेहडपाडा, गावठाण, लोहारपाडा, डोकेपाडा, बेडपाडा या गावांसाठी ७३ लाख रुपये खर्चाची ७३ हजार लिटर क्षमतेची नळ पाणीपुरवठा योजना २०१४ साली करण्यात आली होती. गेली ४ वर्ष ६ महिने ही नळ पाणीपुरवठा योजना सुरळीत चालू होती. याची पाणीपट्टी जनतेकडून ग्रामपंचायतीला वेळेवर भरणाही करण्यात येत असूनही ७७ हजार रूपये या योजनेचा विद्युत बिल न भरल्याने जून २०२१ पासून महावितरणने विद्युत जोडणी काढून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला असल्याने ही योजना बंद आहे. त्यामुळे जनतेला आपली तहान डबकी, खड्यातील, व गढूळ पाण्याने भागवावी लागत आहे.

ग्रामपंचायतीला वारंवार तक्रारी देऊनही बिल भरणा करण्यासाठी ग्रामपंचायत अपयशी ठरल्याने याचा फटका जनतेला बसला आहे. पाणीपट्टी वेळेवर भरणा केलेली रक्कम कुठे गेली. त्यातून विद्युत बिल का भरले नाही, असे अनेक प्रश्न जनता विचारू लागली आहे. ही नळयोजना लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न ग्रामपंचायतीने करावेत व पाणी पुरवठा सुरळीत चालू करावा, अनाथ आंदोलनाचा इशाराही महिला व ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -

गेल्या जून महिन्यापासून पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून गढूळ पाण्याने तहान भागवावी लागत आहे.
– प्रकाश राऊत, वेहेलपाडा, ग्रामस्थ

ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी गेल्या चार वर्षांपासून पाणीपट्टी भरणा केलेली रक्कम गेली कुठे, ग्रामपंचायतीने विद्युत बिल भरणा लवकर करावा व ही नळयोजना सुरळीत चालू करावी. अन्यथा महिला व ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येईल.
– सुभाष भोये, पंचायत समिती सदस्य, विक्रमगड

- Advertisement -

थकीत बिलाची रक्कम लवकर भरणा करून नळयोजना चालू करावी, अशा सूचना ग्रामपंचायतीला करण्यात आल्या आहेत. लवकरच बिल भरणा करून योजना सुरळीत सुरू होईल असे ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा विभागाला सांगण्यात आले आहे.
– तेजस संखे, शाखा अभियंता, पाणी पुरवठा

हेही वाचा –

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांमुळे शेतकर्‍यांची गैरसोय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -