घरमहाराष्ट्रनाशिकपावसाच्या माहेरघराला पाण्याची घरघर

पावसाच्या माहेरघराला पाण्याची घरघर

Subscribe

इगतपुरी धरणाचा तालुका व पावसाचे माहेरघर आणि प्रचंड पर्जन्याचा तालुका, अशी इगतपुरीची ओळख असली तरीही या तालुक्याला आता पाण्याची घरघर लागली आहे..

इगतपुरी धरणाचा तालुका व पावसाचे माहेरघर आणि प्रचंड पर्जन्याचा तालुका, अशी इगतपुरीची ओळख आहे. दरम्यान, दारणा व वैतरणा पाणीसाठा ७५०० दशलक्ष घनफुट, मुकणे साडेतीन टीएमसी, वाकी खापरी अडीच टीमसी, भावली दीड टीएमसी, भाम धरण अडीच टीमसी, कडवा साडेचार टीएमसी, अशी क्षमता आहे. यावर्षी सुरुवातीला तालुक्यात चांगला पाऊस पडल्यामुळे दारणा, वैतरणा, भावली, कडवा, वाकी खापरी, भाम, मुकणे आदी हजारो क्युसेस पाण्याचा विसर्ग केला. मात्र, पावसाळा सरते शेवटी पावसाने दगा दिल्याने ही धरणे काही प्रमाणात रिकामी राहिली. स्थानिक शेतकरी व भुमीपुत्र, धरण प्रकल्पग्रस्तांना प्रथम पाणी पुरवण्याचे सोडून शासन जायकवाडीला पाणी सोडत असल्याने स्थानिकांवर अन्याय झाला आहे. मात्र, आतापासूनच तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे विदारक चित्र आहे.

आवळखेड, मायदरा, धानोशी, आंबेवाडी, टिटोली गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला असून २ गावांत विहिरीचे अधिग्रहणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. ३ गावांत टँकरसाठी प्रस्ताव निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. दरवर्षी दहा ते पंधरा गावांना दरवर्षी टँकर सुरू करावा लागतो. यावर्षी संख्येत वाढ होईल, अशी शक्यता आहे. घोटी शहरातील मंजूर १९ कोटींच्या पाणी योजनेसाठी पाटबंधारे विभागाची अनास्था पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहे. भावली धरणातून पाणी पुरवठा करणारी योजनेचे काम अद्यापही सुरू झालेले नसल्याने याकडे इलेक्शन स्टंट म्हणून नागरिक पाहत आहेत.

- Advertisement -

तालुक्याच्या पाचवीलाच पाणीटंचाई पुजलेली आहे. चुकीच्या पाणी योजना, ग्रामपंचायतींमधील बिकट राजकारण, भ्रष्ट कारभार आणि नियोजनाचा अभाव, स्थानिक लोकप्रतिनिधींची चुप्पी, अशा अनेक कारणांमुळे ग्रामीण जनतेला तृषार्त राहावे लागत आहे. पाणी टंचाईचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर सुध्दा फरक पाडू शकतो. अनेक गावांत विविध पाणी पुरवठ्याच्या योजना कागदोपत्री आकाराला आलेल्या दिसून आलेल्या आहेत.

शहरवासीयांच्या हाल अपेष्टा

इगतपुरी नगरपालिकेतील आतापर्यंतच्या सर्वच लोकनियुक्त लोकप्रतिनिधींच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे शहरात पाण्याचा अत्यंत बिकट प्रश्न आहे. एका आठवड्याला दोन वेळेस अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. विशेष म्हणजे भर पावसाळ्यात सुद्धा भीषण अवस्था अनुभवणार्‍या शहरवासीयांच्या संतप्त भावना वाढत आहेत.

- Advertisement -

विजेमुळे पाणी टंचाई

अनियमित विजपुरवठा, भारनियमन, अशा अनेक कारणांमुळे रडतखडत सुरू पाणी योजना निरुपयोगी ठरत आहेत. वीज मंडळाच्या कारभारामुळे काही गावांत पाणी असूनही पाण्याच्या टंचाईचा करावा लागत आहे.

लहान मुलेही पाण्याच्या शोधात

मार्चच्या सुरुवातीला पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. हंडाभर पाण्यासाठी लहान मुलांना ही डोक्यावर हांडे आणि बादल्या घ्याव्या लागत आहे. भर उन्हात तासनतास विहिरी व बोअरवेल येथे लहान मुले उभे असतात.

विहिरी, कुपनलिका खोदण्याचा धडाका

तालुक्यात विहिरीच्या खोदकामासह बोअरवेल करण्याचा धडाका शेतकर्‍यांनी लावला आहे. यामुळे कायमस्वरुपी पाण्याचा शोध घेण्यासाठी शिवारात विहिरी खोदकामासह कुपननलिका घेण्याचे दृश्य सर्वत्र दिसून येत आहे.

तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

विविध गावांतील पाणी टंचाई प्रकरणी संबंधित ग्रामसेवकांकडून संपर्कात राहून माहिती घेण्यात येते. आवश्यक ठिकाणी योग्य उपाययोजनांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. – किरण जाधव, गटविकास अधिकारी, इगतपुरी

कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक

तालुक्यातून इतर जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. गावे मात्र, पाण्यावाचून तडफडतात. हक्काच्या पाण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. – मनाली पोटकुळे, सरपंच, म्हसुर्ली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -