घरमुंबईट्रान्स हार्बरची वाहतूक ठप्प; दूरूस्तीचे काम सुरू

ट्रान्स हार्बरची वाहतूक ठप्प; दूरूस्तीचे काम सुरू

Subscribe

ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक रखडली असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे

ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तुर्भे-वाशी दरम्यान ही ओव्हरहेड वायर तुटल्याने चाकरमान्यांची दिवसाची सुरूवात काहीशी नाराजीने झाली आहे.

यामुळे, ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक रखडली असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन गर्दीच्या वेळेला चाकरमान्यांचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना पर्यायी वाहतूकीची निवड करावी लागत आहे. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन चाकारमान्यांना आपल्या नियोजित वेळेत पोहचणे कठीण झाले आहे.

- Advertisement -

 

ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बरवरून अप-डाऊन वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे वाहतूक पूर्ववत होण्यासाठी रेल्वे प्रशासनाची टीम दुरुस्तीकरिता घटनास्थळी दाखल झाली आहे. लवकरात लवकर वाहतूक पुर्व स्थितीत होईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

- Advertisement -

विस्कळीत झालेल्या रेल्वे वाहतूकीच्या दुरुस्तीचे काम सुरू असून किमान एक ते दीड तास रेल्वे उशिरा येण्याची शक्यता आहे. या ओव्हरहेड वायरच्या आधारावर असलेल्या लोखंडी पोलवर पक्षांनी घरटं बांधण्यासाठी आणलेल्या वस्तू या ओव्हरहेड वायरवर पडल्याने वायर शॉर्ट होऊन ही घटना घडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -