घरमहाराष्ट्रनाशिककैलास नागरी पतसंस्था गैरव्यवहार : देना बँकेतील १५ लाखांवरही डल्ला

कैलास नागरी पतसंस्था गैरव्यवहार : देना बँकेतील १५ लाखांवरही डल्ला

Subscribe

नाशिक : मर्चंट बँकेच्या त्र्यंंबक शाखेतून तब्बल 2 कोटी 58 लाख रुपये हडप केल्यानंतर कैलास नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहारकर्त्यांनी देना बँकेतील पैसादेखील सोडला नाही. या बँकेच्या चालू खात्यातून या चौकडीने तब्बल 15 लाख 40 रुपये गडप केल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. संस्थेचे चेअरमन राहुल फडके, सचिव वसंत घुले व जनसंपर्क संचालक तुषार माळी यांनी चेकवर सह्या केलेल्या आहेत. देना बँकेतून काढलेले पैसे संस्थेत भरलेच नाहीत, अशी धक्कादायक माहितीही पुढे आली आहे.

त्र्यंबकेश्वर येथील देना बँकेत कैलास नागरी पतसंस्थेचे चालू खाते असून, या खात्यात संस्थेची मोठी रक्कम होती. या खात्यावरही अपहारकर्त्यांनी डल्ला मारत 15 लाख 40 हजार रुपये उडविल्याचे समोर आले आहे. या बँकेतूनदेखील बेअरर चेकच्या माध्यमाने रक्कम काढण्यात आली आहे. संस्थेचे चेकबूक व्यवस्थापक शैलेंद्र गायकवाड यांच्या ताब्यात असते.

- Advertisement -

आवश्यकतेनुसार बँकेतून रोख रक्कम काढण्यासाठी धनादेश तयार करून त्यावर चेअरमन, व्हा. चेअरमन आणि सचिव तसेच जनसंपर्क संचालक यांच्यापैकी दोघांच्या सह्या घेतल्या जातात. त्यानंतर जबाबदार कर्मचार्‍यांना बँकेत पाठवून रोख रक्कम काढून आणणे व ती कॅशियरकडे जमा करणे, जमेची नोंद करणे, नोंद केल्याची खात्री करणे अनिवार्य असताना व्यवस्थापक गायकवाड यांनी कामात हलगर्जीपणा केला.

गायकवाड यांनी मृत कर्मचारी अनिल पाटील कॅशियर दिनकर मोरे यांना पैसे आणण्यास पाठविले मात्र सदर रकमा संस्थेत जमा न करता परस्पर रोख रकमेचा अपहार केला. वटविलेल्या 7 चेकच्या रकमा कॅशिअरकडे जमा झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे संगनमताने 15 लाख 40 हजार इतक्या रोख रकमेचा या चौकडीने अपहार केलेला असून, बँक खात्यातून रोख रकमा काढून त्या संस्थेत जमा न करता अपहार करून संस्थेचा यांचा विश्वासघात केला आहे, असे लेखापरीक्षणात म्हटले आहे.

- Advertisement -

या सर्व चेकवर संस्थेचे चेअरमन राहुल फडके, सचिव वसंत घुले आणि जनसंपर्क संचालक तुषार माळी यांनी सह्या केल्या आहेत. त्यांनी व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केलेल्या कामकाजावर योग्य नियंत्रण ठेवले नाही, चेकवर सह्या करण्यापूर्वी रकमेची आवश्यकता आहे किंवा नाही हातावर किती पैसे शिल्लक आहे. याबाबतची माहिती घेऊन चेकवर सह्या करणे आवश्यक होते. मात्र, संस्थाचालकांनी निष्काळजीपणाने चेकवर सह्या केल्याने अपहार झाल्याचे लेखापरीक्षणात म्हटले आहे. त्यामुळे देना बँकेतील रक्कम कुणाच्या घशात गेली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -