घर महाराष्ट्र नाशिक मजूर फेडरेशन निवडणुकी आधीच पहिला निकाल; संपत सकाळे बिनविरोध

मजूर फेडरेशन निवडणुकी आधीच पहिला निकाल; संपत सकाळे बिनविरोध

Subscribe

नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघाच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी गटातून दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने जेष्ठ संचालक संपतराव सकाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सकाळे यांच्या रूपाने बिनविरोध निवडीचे खाते उघडले आहे.

जिल्हा संघाच्या 20 जागांसाठी 164 अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जाची निवडणूक अधिकारी सुरेशगिरी महंत यांच्या उपस्थितीत छाननी झाली. उमेदवारांची अंतिम यादी गुरूवारी (दि.10) फेडरेशनच्या कार्यालयात प्रसिध्द करण्यात आली. गुरूवारी माघारीच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी गटातून अशोक चव्हाण व रोहित सकाळे या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या गटात सकाळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही घोषणा निवडणूक अधिकारी यांच्याकडून होईल. निवडूण येण्याची सकाळे यांची ही चौथी वेळ आहे. यात एकदा निवडणूक प्रक्रीयेतून तर, तीनवेळा ते बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार हिरामण खोसकर, विनायक माळेकर, समाधान बोडके, दिलीप चव्हाण, गणेश चव्हाण, अशोक चव्हाण, अरूण शिंदे, बापू सकाळे, अजित सकाळे आदींनी त्यांचा सत्कार केला. अजून किती संचालक बिनविरोध निवडले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -