घरमहाराष्ट्रनाशिकभूमीअभिलेख झाले टेक्नोसेव्ही; पेठ तालुक्यात ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षण

भूमीअभिलेख झाले टेक्नोसेव्ही; पेठ तालुक्यात ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षण

Subscribe

पेठ : शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण मोजणीच्या पेठ तालुक्यातील १३५ गावचे गावठाणांचे सर्वेक्षण कामाचा प्रारंभ गुरुवारी (दि.३) कोटंबी येथून गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांचे हस्ते उद्घाटन करून करण्यात आला.

भूमि अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे पेठ तालुक्यातील गावठाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून तालुक्यांतील १३५ गावांची निवड करण्यात आली आहे. ड्रोनद्वारे होणार्‍या या मोजणीमुळे ग्रामपंचायतींच्या हद्दींचे नकाशे उपलब्ध होणार असून, जमीन मोजणीची प्रक्रिया सोपी होऊन नागरिकांना मालमत्तांच्या मालकी हक्कांचे प्रमाणपत्र मिळू शकणार आहेत. बहुतांश गावठाणांचे अभिलेख नसल्याने जमिनींचे व्यवहार करताना अनेकदा अडचणी येत असतात. ड्रोनच्या माध्यमातून मालमत्तांची मोजणी केली जाणार असल्याने गावांतील ग्रामपंचायतींचे नकाशे, सरकारी जमिनी आणि सरकारी जमिनींबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

ड्रोनचा वापर करण्यासाठी राज्य सरकार आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांच्यात करार झाल्याने हे काम वेगाने आणि अचूकपणे केले जाणार आहे. यावेळी तालुका भूमी अभिलेखचे अधीक्षक नंदा बहिरट, गटविकास अधिकरी नम्रता जगताप, ग्रामसेवक यशवंत भोये, कृषीतज्ज्ञ यशवंत गावंढे, कोंटबीचे सरपंच किरण भुसारे, उपसरपंच मेघा शिंदे, राजाराम गावित, यशवंत भुसारे, प्रदिप वावरे, संजय भरसट, सर्व्हे ऑफ इंडियाचे अनिकेत निकाळे, नगरसेवक रामदास गायकवाड, मुरलीधर निंबेकर, भाऊसाहेब आंबेकर, वैभव रावले, मोतीलाल चौरे, हरिश्चंद्र भुसारे, रामभाऊ वाघमारे, सुनील भुसारे, जीवला जाधव, मंगला चौधरी, भारती गावीत, सुनिता भुसारे, गौरव चौधरी, कृष्णा चौधरी, दिलीप भुसारे, पंढरीनाथ पाडवी, खंडू शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -