घरदेश-विदेशपोलिसांची परीक्षा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बदलला वेष, केली सशस्त्र हल्ल्याची तक्रार

पोलिसांची परीक्षा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बदलला वेष, केली सशस्त्र हल्ल्याची तक्रार

Subscribe

लखनऊ – कामाप्रती आपले कर्मचारी किती तत्पर असतात हे पाहण्याकरता वरिष्ठांकडून विविध चाचणी घेतली जाते. या चाचणीत अनेकदा कर्मचारी नापास होतात. मात्र, उत्तर प्रदेशात एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने घेतलेल्या परिक्षेत पोलीस पास झाले आहेत.

मी सरिता चौहान बोलतेय. दोघांनी माझ्यावर सशस्त्र हल्ला केला, असा फोन ११२ क्रमांकावर पोलिसांना आला. पोलिसांनी त्या महिलेच्या तक्रारीची नोंद घेत तपासकार्य सुरू केलं. मात्र, तिने केलेल्या वर्णनाप्रमाणे तिथे कोणीच सापडलं नाही. जागा निर्जन होती. त्यामुळे असा हल्ला झाला असावा असं पोलिसांना सुरुवातीला वाटलं. मात्र, तिथे कोणीच सापडलं नाही. उशीराने या पोलिसांच्या लक्षात आलं की तक्रार करणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्यांचीच वरीष्ठ अधिकारी आहे. आयपीएस अधिकारी चारू निगम यांनी कुर्ता घालून चेहऱ्यावर ओढणी ओढून घेतली होती. तसंच, डोळ्यांवर काळा चष्मा लावला होता. त्यामुळे पोलिसांनी आधी त्यांना ओळखलं नाही. मात्र, नंतर पोलिसांच्या लक्षात आलं.

- Advertisement -

आयपीएस अधिकारी चारू निगम यांनी घेतलेल्या या परीक्षेत पोलीस पास झाल्याने चारू निगम यांनी आनंद व्यक्त केला. उत्तर प्रदेशच्या औरिया पोलिसांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -