घरमहाराष्ट्रनाशिकसातपूरमधील प्रभाग २६मध्ये गुरुवारी कमी दाबाने पाणी

सातपूरमधील प्रभाग २६मध्ये गुरुवारी कमी दाबाने पाणी

Subscribe

सातपूर परिसरातील पपया नर्सरी भागातील पाईप लाईनला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाल्याने ती दुरुस्तीचे काम महापालिकेच्या वतीने येत्या गुरुवारी (दि.२३) करण्यात येणार आहे. त्यामुळे सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक २६ मध्ये येत्या गुरुवारी दुपारी १२ नंतरचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल असे महापालिकेने कळवले आहे.

सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथुन प्रभाग क्रमांक  26 मधील जलकुंभ भरणे व पाणी वितरणा करीता 1000 मीलीमीटर व्यासाच्या एम.एस पाईप लाईनव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सदरची मुख्य पाईपलाईनला पपया नर्सरी चौकात गळती सुरु झाल्याने मोठया प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे ही पाईपलाईन ही तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. हे दुरुस्तीचे काम येत्या गुरुवार सकाळी 9 वाजेपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 26 मधील आर्शिवाद नगर, म्हाडा, संजीव नगर, भोर टाऊनशिप, जाधव संकुल, पाटील पार्क, चुंचाळे घरकुल व परीसर या भागात गुरुवारी सकाळी 12 वाजेनंतरचा होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने व कमी वेळ होईल, असे पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

सातपूरमधील प्रभाग २६मध्ये गुरुवारी कमी दाबाने पाणी
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -