घरमहाराष्ट्रनाशिकमनमाड पाणी प्रश्न सुटणार;३५० कोटी निधी मंजूर

मनमाड पाणी प्रश्न सुटणार;३५० कोटी निधी मंजूर

Subscribe

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे : आमदार कांदेंसोबत केली पाहणी

मनमाड : शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी करंजवन पाणी पुरवठा योजनेसाठी नगरोउत्थान अंतर्गत 350 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यातून मनमाड शहरासोबत नांदगाव विधानसभा मतदारसंघात विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मंत्री शिंदे एका खासगी कार्यक्रमासाठी मनमाडला आले होते. यावेळी आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, मनमाड शहराचा पाणी प्रश्न असो किंवा संपूर्ण नांदगाव तालुक्यातील समस्या आमदार कांदे त्या सोडविण्यासाठी माझ्याकडे सतत पाठपुरावा करतात. निधी मिळावा यासाठी सातत्याने त्यांचा पाठपुरावा सुरु असतो. त्यांची तळमळ ही वाखाणण्याजोगी आहे.

- Advertisement -

करंजवन पाणी पुरवठा योजनेसाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली असून याव्यतिरिक्त शहरातील रस्ते, पूल व इतर विकास कामासाठी देखील निधी दिला जाणार आहे. आगामी काळात मनमाड, नांदगाव या शहरासोबत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला जाईल, असे आश्वासन मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

अमरावतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादावर बोलतांना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या बाबतीत काहीही खपून घेतले जाणार नाही. अमरावतीत घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. मंत्री शिंदे यांचे मनमाड शहरात आगमन होताच आमदार सुहास कांदे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी माजी नगराध्यक्ष बाबी कवडे, गणेश धात्रक, साईनाथ गिडगे, प्रवीण नाईक, फरहान खान, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संतोष बलीद, शहर प्रमुख मयूर बोरसे, सुनील पाटील, अ‍ॅड.सुधाकर मोरे यांसह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -